Pune Crime | गजा मारणेच्या 4 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) कुख्यात गुंड गजा मारणे (gaja marne) याची तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहातून (Taloja Central Jail) सुटका झाल्यानंतर त्याची रॅली (Rally) काढण्यात आली होती. समाजामध्ये दहशत (Pune Crime) निर्माण करण्याच्या उद्देशाने रॅली काढून त्याचे चित्रिकरण करण्यात आले होते. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade police station) शिरगाव पौलीस चौकीत (Shirgaon Police Chowki) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात (Pune Crime) गजा मारणेच्या चार साथीदारांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर (Additional Sessions Judge V.D. Nimbalkar) यांनी फेटाळून लावला आहे.

 

 

गणेश नामदेव हंडारे (Ganesh Namdev Handare), सचिन आप्पा ताकवले (Sachin Appa Takwale), प्रदीप दत्तात्रय कंधारे (Pradip Dattatraya Kandhare) आणि अनंता ज्ञानोबा कदम (Ananta Gyanoba Kadam) या चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. गजा मारणे याची 15 फेब्रुवारी रोजी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. त्यावेळी गजा मारणेच्या साथीदारांनी सार्वजनीक ठिकाणी दहशत निर्माण (Pune Crime) करण्याच्या उद्देशाने बेकायदा गर्दी जमवली. तसेच फटाके वाजवून आरडा-ओरडा करत त्याचे चित्रीकरण केले. याशिवाय मास्क न लावता कोरोना नियमांचे उल्लंघन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गजा मारणेसह 70 ते 80 जणांवर गुन्हा (FIR) दाखल असून त्यापैकी चार जणांनी अटकपूर्व जामीनासाठी (Pre-arrest bail) अर्ज केला.

 

 

 

 

आरोपींच्या अटकपूर्व जामीनावर सरकारी वकील प्रमोद बोंबटकर (Lawyer Pramod Bombatkar) यांनी विरोध केला. हे सराईत आरोपी आहेत. ताकवले याच्यावर 4, कदमवर 8, कंधारेवर 7 तर हुंडारे याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत. या चौघांनी रॅलीसाठी मनुष्यबळ, वाहनांची जुळवाजुळव आणि आर्थिक पुरवठा केल्याची शक्यता आहे. या आणि गुन्ह्यातील इतर साथीदार कोण आहेत, याच्या शोधासाठी चार जणांना अटक करणे गरजचे आहे. त्यामुळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटळण्याची (bail application rejected) मागणी बोंबटकर यांनी केली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गजा मारणे याने 25 फेब्रुवारी रोजी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर होऊन जामीन घेतला आहे.

 

Web Title :- Pune Crime | The pre-arrest bail of 4 accomplices of Gaja Marane was rejected

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा