Pune Crime | लोहगाव येथे मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 12 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोहगाव येथील पासरे वस्तीमध्ये सुरु असलेल्या बेकायदेशीर कल्याण मटका जुगार अड्ड्यावर (Kalyan Matka Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) मंगळवारी (दि.6) छापा टाकला. या करावाईत जुगार खेळत व खेळवत असलेल्या 12 जणांना ताब्यात घेऊन 20 हजार रुपये (Pune Crime) जप्त केले.

लोहगाव (Lohgaon) पासरे वस्ती येथील यश हॉटेलच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना समजली. पोलिसांनी (Pune Police) पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी काहीजण पैशावर कल्याण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जुगार खेळत व खेळवत असलेल्या 12 जणांना ताब्यात घेऊन 20 हजार 70 रुपये जप्त केले. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) 12 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला. आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Shridhar Khadke), पोलीस अंमलदार अजय राणे, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

Web Title :-  Pune Crime | The rickshaw driver beat and robbed the passenger

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | सुप्रीम कोर्टात नेमंक काय झालं? ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवा ! शिंदे गटाची मोठी मागणी

Peeing After Alcohol Drinking | दारू प्यायल्यानंतर लघवीला जास्त का होते? जाणून घ्या कारण आणि धोका

Best Multibagger Stock 2022 | शेअर बाजाराच्या वाटचालीवर मात करणारा स्टॉक, वर्षभरात पैसे झाले दुप्पट