पुणे : Pune Crime | सेव्हन लव्हज चौकातून (Seven Loves Chowk) ताम्हिणी घाटातील (Tamhini Ghat) आदरवाडी येथे सोडण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) हिंगणे येथील कॅनॉल रोडवर (Canal Road, Hingane) नेऊन एका प्रवाशाला लोखंडी पाईपाने मारहाण (Beating) करुन लुबाडले. (Pune Crime)
याप्रकरणी पिंकु श्री दास Pinku Shri Das (वय ३०, रा. आदरवाडी, ताम्हिणी घाट, मुळशी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८७/२२) दिली आहे. हा प्रकार हिंगणे रोडवरील कॅनॉललगत सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकु दास हे आपल्या घरी जाण्यासाठी सेव्हन लव्हज चौकात वाहनांची वाट पहात होते.
त्यावेळी रिक्षाचालकाने त्यांना आदरवाडी येथे सोडण्याचे व मीटरप्रमाणे पैसे घेण्याचा बहाणा केला.
त्यांना रिक्षाने सिंहगड रोडवरील हिंगणे रोडवरील कॅनॉललगत घेऊन गेले. तेथे फिर्यादी यांना खाली उतरण्यास सांगितले. त्यांनी नकार देताच त्यांनी बाहेर ओढून ढकलून देऊन खाली पाडले. रिक्षातून लोखंडी पाईप काढून त्याने मारण्याची भिती दाखविली. त्यानंतर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या पँटच्या खिशातील ३ हजार रुपये रोख व मोबाईल असा ९ हजार ८०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक लोहार (SI Lohar) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | The rickshaw driver beat and robbed the passenger
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kirit Somaiya | उजवा हात तुरुंगात गेलाय आता डावा हातही जाईल – किरीट सोमय्या