Pune Crime | रिक्षाचालकाने तिघा साथीदारांसह तरुणाला लुबाडले; मंगळवार पेठेत चाकूचा धाक दाखवून PhonePe द्वारे घेतले पैसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पार्सल आणण्यासाठी पहाटे शहर रिक्षाने जात असताना रिक्षाचालकाने मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth) रेल्वे पुलाखाली नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल, PhonePe द्वारे पैसे घेऊन तरुणाला लुबाडले. (Pune Crime)

 

याप्रकरणी अनुप शिवहरी शिगोकर (वय १८, रा. ओम सुपर मार्केट, मॉडेल कॉलनी) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप हे वडिलांनी पाठवलेले पार्सल आणण्यासाठी संगमवाडी येथे जात होते. त्याच्यासोबत त्याचा रुमपार्टनर रवींद्र मालखेडे याला घेऊन ६ मार्च रोजी पहाटे पावणेसहा वाजता ते जात होते. रिक्षाचालक व त्याच्याबरोबर दोघे जण बसले होते. त्यांनी रिक्षा संगमवाडी येथे न सोडता मंगळवार पेठेतील रेल्वे पुलाखाली नेले. तेथे त्यांनी चाकूचा धाक दाखवून (Pune Crime) दोघांचे २ मोबाईल त्यांच्या खिशातील १ हजार रुपये तसेच फोन पे वरुन १ हजार ८०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याचा मित्र सार्थक याचे मोबाईलमधील फोन पे द्वारे २ हजार रुपये बळजबरीने ट्रान्सफर करुन घेतले. रिक्षामधील दोघांनी त्यांना दगडाचा धाक दाखवून तेथून निघून जाण्यास सांगून २६ हजार ७०० रुपयांचा माल जबरदस्तीने चोरुन रिक्षातून पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The rickshaw puller robbed the youth along with three accomplices Money taken by PhonePe at the mangalwar peth

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा