Pune Crime | गल्लीतील ‘भाई’ म्हणविणार्‍याने कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा केला प्रयत्न; हडपसर पोलिसांकडून चौघांविरूध्द गुन्हा

पुणे : Pune Crime | पूर्ववैमनस्यातून काळेपडळ येथील ‘गल्लीतला भाई’ म्हणविणार्‍याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) चौघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

योगेश कुंदर (वय २५), मुन्ना बलाडे (वय १९), अनिकेत कुंदर (वय २०) आणि चेतन कांबळे (वय २०, सर्व रा. नाईकनवरे बिल्डिंग, काळेपडळ, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सौरभ दत्तात्रय चौतमहल (वय २०, रा. नाईकनवरे सोसायटी, काळेपडळ, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र लखन कासले व नामदेव सोडगे हे काळेपडळ रोडवरील (kalepadal hadapsar) समृद्धी रेस्टॉरंटसमोर (samrudhi restaurant) रविवारी दुपारी बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी सौरभ याला जवळ बोलावून जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन कोयत्याने फिर्यादीच्या हाताचे मनगटावर व डोक्यात वार केले. तसेच इतरांनी दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाण करताना कुंदर हा ‘मी या गल्लीतला भाई आहे,’ असे हत्यारासह ओरडून परिसरात दहशत निर्माण करीत होता. हडपसर पोलिसांनी (Hadapsar) चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक
पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

IND vs ENG | Jasprit Bumrah-Mohammed Shami ने इंग्लंडला असा दिला धक्का, वेगवान फलंदाजीने मॅचला दिली कलाटणी

Corona Vaccination | देशात लसीकरणाचा आकडा 55 कोटीच्या पुढे, ऑगस्टच्या 15 दिवसात देण्यात आले व्हॅक्सीनचे 7.5 कोटी डोस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | The so-called ‘brother’ in the street tried to kill the youth with a scythe; Crime against four by Hadapsar police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update