×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime | ट्रकचालकाला (Truck Driver) थांबवून त्याला कोयत्याचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. या तिघा चोरट्यांपैकी एकाला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक (Arrest) केली आहे.

नितिन सुनिल चव्हाण Nitin Sunil Chavan (वय २२, रा. भराडी वस्ती, वैदुवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत राम सुदाम मोहाळे Ram Sudam Mohale (वय २७, रा. खोकलेवाडी, परभणी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२१७/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मोहाळे हे ट्रक घेऊन रविवारी मध्यरात्री मंतरवाडी रोडवरुन
(Mantarwadi Road, Pune) जात होते. त्यावेळी तिघे जण मोटारसायकलवरुन आले.
त्यांनी जबरदस्तीने ट्रक थांबविला. त्यांच्यातील दोघे ट्रकवर चढून फिर्यादी यांना मारहाण (Beating) केली.
एकाने कोयता बाहेर काढून तुझ्याकडे पैसे किती आहे ते सर्व पैसे व मोबाईल काढून दे नाही तर मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यांच्याकडील १० हजार रुपयांची रोकड व मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यातील एकाला अटक केली आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या नाईट ड्युटी मार्शल्सच्या सतर्कतेने गुन्हा उघड झाला असून हडपसर तपास पथकाने तात्काळ आरोपी ताब्यात घेतले.
मुद्देमाल रिकव्हरीसाठी न्यायालयात आरोपींना हजर करण्यात येणार असून
त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Pune Crime | The truck driver was robbed by showing fear of coyotes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कंपनी मालकाने महिला कर्मचार्‍याच्या घरी जाऊन केली अश्लिल शिवीगाळ; कोरेगाव पार्कमधील पॉश सोसायटीतील घटना

NCP | आधी म्हणाले, मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता चक्क…, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीने लगावला खोचक टोला!

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News