Pune Crime | भांडण सोडविण्यास आलेल्या दोघा मेव्हण्यांनाच केली मारहाण

पुणे : Pune Crime | पतीपत्नीतील भांडणे सोडविण्यासाठी भाऊ आले असताना मेव्हण्यांना कटरने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार हांडेवाडी (Handewadi ) येथे (Pune Crime) घडला.

याप्रकरणी मनीष शंकर शिंदे (वय २७, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर- Lonikalbhor ) यांनी हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन हडपसर पोलिसांनी शरद नरेंद्र भोसले, नरेंद्र भोसले (रा. दौलतनगर बंगला, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद भोसले हे फिर्यादी मनीष शिंदे यांचे दाजी आहेत. फिर्यादी यांची बहीण आणि त्यांचे दाजी यांच्यात किरकोळ घरगुती कारणावरुन भांडण झाले. याची माहिती मिळाल्यावर फिर्यादी व त्यांचा भाऊ नकुल शिंदे हे भांडण सोडविण्यासाठी हांडेवाडी चौक येथे गेले. दोघे भाऊ आल्याचे पाहिल्यावर शरद भोसले यांना राग आला. त्यांनी प्लॉस्टिक कव्हर असलेला कटरने फिर्यादी व त्यांचे भावाला मारुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन जखमी केले.

हे देखील वाचा

Supreme Court | काळ्या कोटपासून हवा दिलासा ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उन्हाळ्यात वकिलांना दिलासा देण्याची विनंती

Gold Price Today | आज ‘स्वत’ झाले सोने-चांदी, जाणून घ्या किती घसरण झाली किमतीत?

Pune News | मंदिरे उघडण्यासाठी भाजप पुन्हा आक्रमक ! कसबा गणपतीसमोर शंखनाद, राज्यात सर्वत्र आंदोलन (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | The two sisters-in-law who came to settle the quarrel were beaten

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update