क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | लग्नातील फोटो सेशन पडले साडेपाच लाखांना; लग्नात सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने लांबविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रेसिडेन्सी क्लब (Residency Club Pune) येथे लग्न समारंभ (Marriage Function) सुरु असताना नातेवाईकांनी फोटो सेशनसाठी (Photo Session) स्टेजवर बोलावले, त्यासाठी त्यांनी दागिने असलेली बॅग सोफ्यावर ठेवली. ही संधी साधून चोरट्यांनी ५ लाख ६८ हजार रुपयांची रोकड व दागिने असलेली बॅग लंपास केली. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे लग्न रेसिडेन्सी क्लबमधील क्वीन्स लॉन्समध्ये आयोजित करण्यात आले होते. लग्नातील विविध खर्च व लोकांना पैसे देण्यासाठी त्यांनी एका बॅगेत ५ लाख ५० हजार रुपये रोख, सोन्याचे पेंडंट, मोबाईल असा ५ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज ठेवला होता. (Pune Crime)

 

ही बॅग त्यांच्याकडे दिवसभर होती. लग्नमध्ये फोटो सेशनसाठी त्यांना स्टेजवर बोलावले. त्यामुळे त्यांनी पैशांची ही बॅग जवळ असलेल्या सोफ्यावर ठेवली. फोटो सेशन सुरु असताना चोरट्याने ही संधी साधून ही बॅग लंपास केली. काही वेळाने त्यांना आपली बॅग जागेवर नसल्याचे लक्षात आले. त्यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी तेथील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे.

Web Title :- Pune Crime | The wedding photo session cost over five and a half lakhs; A bag of gold jewelery was stolen at the wedding

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Power Outage Pune | …म्हणून रविवारी पहाटे पुण्यातील नगर रोड, विमान नगर, कल्याणी नगर, येरवडा भागातील वीज पुरवठा बंद राहणार

Raj Thackeray Grandson | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नातवाची झलक पाहिलीत का?, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Maharashtra Municipal Election 2022 | सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात महापालिका निवडणुका होणार का ?; राज्य सरकारच्या बैठकीतील माहिती आली समोर !

Pune Crime | सराईत गुन्हेगार अक्षय दशरथ अकोलकर याच्यासह 6 जणांच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

SSC, HSC Result 2022 | 10 वी आणि 12 वीचा निकाल जूनमध्येच जाहीर होणार

Back to top button