×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पतीचा बनावट मृत्यु दाखला सादर करुन पत्नीने केली स्वत:च्या...

Pune Crime | पतीचा बनावट मृत्यु दाखला सादर करुन पत्नीने केली स्वत:च्या नावावर जमीन

पुणे : Pune Crime | घटस्फोट (Divorce) घेतलेल्या पतीचा बनावट मृत्यु दाखला (Fake Death Certificate) तलाठी कार्यालयात (Talathi Office) सादर करुन पत्नीने त्याच्या नावावर असलेला प्लॉट आपल्या व मुलांच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी इरफान मैनुद्दीन शेख Irfan Mainuddin Sheikh (वय ४९, रा. दक्षिण सदर बाजार, सोलापूर) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६०५/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांची पत्नीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान शेख यांचा विवाह रुखसाना सय्यद (Rukhsana Sayyed) यांच्याबरोबर १९९९ मध्ये झाला होता. त्यांना दोन मुले आहेत.
त्यांची किवळे येथे ३ गुंठे मोकळी जागा तसेच सुखसागर बिल्डींग (Sukhsagar Building) मध्ये २ फ्लॅट आहेत. ते कामानिमित्त सौदी अरेबिया (Saudi Arabia) देशात होते.
त्यानंतर २०१७ मध्ये भारतात परत आले.
घरी आल्यावर त्यांची पत्नी छोट्या मोठ्या कारणावरुन भांडणे करु लागली.
त्यांच्याकडे तलाक मागु लागली. फिर्यादी यांनी वाद नको म्हणून ते सोलापूरला निघून गेले.
त्यांच्यावर असलेल्या २ फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये त्यांची पत्नी रहात असून दुसरा भाड्याने दिला असून ते भाडे पत्नीच घेते. (Pune Crime)

फिर्यादी हे ३० जून २०२२ रोजी तलाठी कार्यालयात ७/१२ व जागेचा टॅक्स भरण्याकरीता आले होते.
त्यावेळी त्यांना ७/१२ वरील त्यांचे नाव कमी करुन तेथे त्यांची पत्नी रुखसाना व मुलांच्या नावे लावण्यात आल्याचे समजले.
त्यांनी ही नावे कोणी लावली याबाबत चौकशी केल्यावर त्यांना समजले की,
त्यांच्या पत्नीने त्यांचा खोटा मयत दाखला तलाठी कार्यालय येथे सादर करुन त्यांच्या नावावरील ३ गुंठे जागा
स्वत:च्या व मुलांच्या नावावर करुन फसवणुक (Fraud Case) केली.

Web Title :- Pune Crime | The wife transferred the land in her own name by submitting the fake death certificate of her husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dhananjay Munde | पंकजा मुंडे यांच्याबाबत धनंजय मुंडे म्हणाले – आमच्यात भाऊ-बहिणीचे नाते राहिले नाही, राजकारणात एकमेकांचे…

Ajit Pawar | छगन भुजबळांचे ’ते’ मत वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही; अजित पवारांनी केला खुलासा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News