Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेला लुबाडले; लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन मुलाला लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) आणले असल्याचे सांगून एकाने महिलेकडील मोबाईल (Mobile), सोन्याचे दागिने (Gold Jewelry), रोख रक्कम लुबाडून (Fraud Case) नेण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी वाघोली (Wagholi) येथे राहणार्‍या एका ३८ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २८५/२२) दिली आहे. ही घटना बकोरी फाट्याजवळील बसस्टॉप ते लोणीकंद पोलीस ठाणे या दरम्यान शनिवारी सायंकाळी सव्वा चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बकोरी फाटा (Bakori Fata) येथील बसस्टॉपवर थांबलेली असताना एक जण यांच्याजवळ आला. त्याने आपण मोरे पोलीस असल्याचे सांगितले. तुमच्या मुलाला लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) अटक केली आहे. त्यात तुम्हाला मदत करतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने गाडीवर बसवून तिला लोणीकंद पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला आणले.

तेथे त्याने तुमच्या अंगावरचे दागिने, मोबाईल जे आहे ते काढून माझ्याकडे द्या. पोलीस ठाण्यात हे घालून जाऊ नका, असे सांगितले.
त्याप्रमाणे फिर्यादी यांनी त्याला ४५ हजार ५०० रुपयांचे दागिने, रोकड, मोबाईल असा ऐवज दिला.
त्यानंतर तो मी मोटारसायकल पार्क करुन येतो, असे सांगून तो तेथून पळून गेला.
बराच वेळ वाट पाहिल्यावर आपल्याला फसविल्याचे (Cheating Case) या महिलेच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव (Sub-Inspector Of Police Jadhav) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The woman was robbed in lonikand area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा