Pune Crime | खडकमाळ आळीत भाईगिरी करणार्‍यांकडून तरुणावर कोयत्याने वार; टोळीवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्रांकडे खंडणी (Ransom) मागू नका, असे सांगितल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने (Criminals Gangs In Pune) तरुणावर कोयत्याने, दगडाने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). ही घटना खडकमाळ आळीतील (Khadakmal Ali) सेंट टेरेसा चर्च ( St Teresa Church) समोर व अलका चित्रपटगृहाजवळ (Alka Talkies) सोमवारी पहाटे सव्वा दोन वाजता घडला. (Pune Crime)

 

याप्रकरणी गौरव सुरेश कांबळे (वय २५, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६४/२२) दिली आहे. त्यावरुन श्रीनाथ ऊर्फ टीक्या शेलार, गणेश कोळी, कुणाल जाधव, विपुल इंगवले, प्रणव माने (सर्व रा. खडकमाळ, घोरपडी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला असून कुणाल जाधव याला अटक केली आहे. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादीचे मित्र लखन रेवचंदाणी व मृणाल कांबळे यांना आरोपी फोन करुन खंडणी स्वरुपात पैशांची मागणी करत होते (Extortion Case). पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी देत असत. तेव्हा फिर्यादी गौरव याने आरोपीला त्यांचे मित्राना पैसे मागू नका, असे सांगितल्यामुळे ते सर्व आरोपी (Pune Criminals) फिर्यादीवर खुन्नस ठेवून होते. गौरव कांबळे हा खडकमाळ आळीतील चर्चसमोर असताना आरोपींनी त्यांना गाठले. तुला लय दिवस शोधत होतो, आता भेटला आहेस. तुला सोडणार नाही. तुला खल्लासच करतो, असे म्हणून श्रीनाथ शेलार याने कोयत्याने मारहाण केली. गणेश कोळी याने दगडाने मारहाण केली. तसेच फिर्यादीचा मित्र मृणाल याच्या डोक्यात मारण्यासाठी कोयता उगारुन त्याचे हातावर वार केला. इतरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीची दुचाकी व मित्र लखन रेवचंदाणी याची दुचाकी जबरदस्तीने चोरुन नेले. पोलीस उपनिरीखक खंडाळे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The youth was attacked with a scythe by those who were bhaigiri in Khadakmal Aali; Attempt to murder case on gang in khadak police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra 12th Result 2022 | 12 वी बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला लागण्याची शक्यता; विद्यार्थी-पालकांची उत्सुकता शिगेला

 

Kirit Somaiya On Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चाललेत का?’ – किरीट सोमय्या

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर