Pune Crime | राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातून पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुण्यात मागील (Pune Crime) काही दिवसांत चंदनचोरीच्या (sandalwood theft) घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश झाडे महत्त्वाच्या संस्था, कंपन्यांच्या आवारातील असल्याने या परिसरातील सुरक्षेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच आता पुण्यातील (Pune Crime) वानवडी (Wanwadi) येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) आवारातील चंदनाची चार झाडे चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एसआरपीएफ आवारातील चार चंदनाची झाडे कापून नेली आहे. दोन महिन्यांपूर्वी अशीच घटना या ठिकाणी घडली होती.

 

याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाचे सहायक पोलीस फौजदार विक्रांत सूर्यवंशी (Vikrant Suryavanshi) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलीस दलाचे परिसर विस्तीर्ण आहे. मुख्यालयाच्या आवारात असलेली चार चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली. शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या (Pune Crime) आहेत. शासकीय कार्यालये तसेच बंगल्यांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आली आहेत. पोलीस हवालदार आर. आर. रासगे (Police Constable R. R. Rasage) तपास करत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Theft of sandalwood tree again from the premises of State Reserve Police Force pune unit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Cabinet Decision | ठाकरे सरकारचे 4 मोठे निर्णय; जाणून घ्या

Transport Commissioner Avinash Dhakne | वाहन चालकांनो सावधान ! सिग्नल तोडल्यास, लायसन्स नसल्यास भारावा लागणार दुप्पट दंड !

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…