Pune Crime | ‘त्यांनी’ पोलिसांना ‘बोलावले’ अन् पोलिसांनीच घातल्या ‘बेड्या’ ! ‘मानवाधिकार’च्या 7 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी का केली अटक? जाणून घ्या सविस्तर

पुणे : Pune Crime | मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी (Officials of the Human Rights and Corruption Prevention Association) असल्याचे सांगून किराणा दुकानदाराला भेसळ करता म्हणून धमकाविले. रुबाब दाखविण्यासाठी त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पण, तो डाव त्यांच्यावरच उलटला. पोलिसांनी खंडणी उकळणार्‍या या कथीत मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या ७ पदाधिकार्‍यांना अटक (Pune Crime) केली आहे. हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तुद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योस्त्ना पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सुरजाराम रुपाराम चौधरी (वय ३७, रा. तळेगाव दाभाडे) यांनी वाकड पोलिसांकडे (Wakad Police) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे रहाटणी येथील रामनगरमध्ये बालाजी ट्रेडर्स या नावाचे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानात १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ७ जण आले. आम्ही मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे त्यांनी चौधरी यांना सांगितले. तुम्ही धान्यात भेसळ करता अशी आमच्याकडे माहिती आहे. तुम्हाला आणि तुमच्या भावाला १० वर्षे जेलमध्ये पाठवून, अशी धमकी त्यांनी दिली.

Pune Crime | ‘गुप्ता’ व ‘गाडा’ बिल्डरशी संगनमत करुन जागा बळकाविण्यास ‘मदत’; पुणे ‘महापालिका’, हवेलीच्या ‘भूमि अभिलेखा’च्या ‘त्या’ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

हे करायचे नसेल तर आम्हाला २५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. चौधरी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावाच्या खिशातील ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर ते शनिवारी पुन्हा आले. त्यांनी २ लाख रुपयांची मागणी केली. नाही तर पोलिसांना बोलावतो, असे सांगितले. त्यांच्यावर रुबाब दाखविण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावले. वाकड पोलीस (Wakad Police) तातडीने दुकानात आले. तेव्हा चौधरी यांनी आपल्याकडे हे खंडणी मागत असल्याचे सांगितले. भावाच्या खिशातील ८ हजार ५०० रुपये घेऊन गेल्याचे सांगितले. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सातही जणांना अटक केली.

हे देखील वाचा

Vijay Rupani | … म्हणून विजय रूपाणींना गमवावे लागले मुख्यमंत्रीपद; PM मोदींच्या कार्यक्रमातही होते उपस्थित

Pune Crime | 2 कोटीचं फसवणूक प्रकरण : पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर, दीप पुरोहित आणि रिनल पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल; कार्यालयात बोलावून मारहाण करुन केला पाय फ्रॅक्चर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | “They” called the police. Why did the police arrest 7 human rights activists? Learn in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update