Pune Crime | कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune Crime) चोरट्यांनी (thieves) धुमाकूळ घातला असून चोरट्यांनी कात्रज परिसरातील चार सोसायट्यांमधील फ्लॅट फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील (Pune Crime) कात्रज येथील वंडर सिटी (Wonder City) मधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 97 हजारांचा ऐवज लंपास केला. याच परिसरातील आणखी तीन सोसायट्यांमध्ये चोरट्यांनी चोरी केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिलिंद साठे Milind Sathe (वय-58 रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कारमधून आलेल्या चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात वंडर सिटी सोसायटीतील ‘जे’ इमारतीत साठे यांचा फ्लॅट आहे. या ठिकाणी त्यांची आई राहते. सध्या हा फ्लॅट बंद आहे. (Pune Crime)

 

4 डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास चोरटे मोटारीतून सोसायटीत शिरले. त्यांनी साठे यांच्या आईच्या फ्लॅटचा सेफ्टी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील 17 हजारांची रोकड, दागिने (Jewelry) असा 97 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या दिवशी साठे यांना या घटनेबाबत समजले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

वंडर सिटी बरोबर या परिसरातील सुनीता रेसीडेन्सी, तोरणा सोसायटी मधील प्रत्येकी दोन फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.
या सोसायट्यांमधील घरफोड्यांत चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. तर करण भारती सोसायटीत एका गाडीचे चोरट्यांनी नुकसान केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता (PSI Dheeraj Gupta)करीत आहेत.

 

गुन्ह्यात वापरलेली कार चोरीची
वंडर सिटी आणि इतर तीन सोसायट्यांमध्ये घरफोडी करण्यासाठी चोरटे एका कारमधून आले होते.
वंडर सिटीच्या सीसीटीव्हीत दिसत आहे. गुन्ह्यात वापरलेली कार चोरीची असून ती तीन दिवसांपूर्वी निगडीतून (Nigdi) चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी मास्क घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. गाडीत दोन किंवा तीन चोरटे असण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune Crime | thieves break lock of flat in wonder city area of katraj bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stock Market | गुंतवणुकदार झाले मालामाल! 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी रुपये, सेन्सेक्समध्ये 800 पॉईंटची वाढ

CDS Bipin Rawat | हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत शहीद; मधुलिका बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू

Income Tax Department | गुजरातमधील उद्योगावर प्राप्तिकर विभागाचा छापा; 500 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस