Pune Crime | पुण्यात उपचाराच्या बहाण्याने हॉस्पिटलवर दरोडा, मेडिकल काऊंटरमधील रोकड चोरली; कोंढवा पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या बहाण्याने आलेल्या चार जणांनी हॉस्पीटलमधील कर्मचाराऱ्याला मारहाण करुन मेडिकल काऊंटरमधील रोकड आणि इंजेक्शन चोरुन नेले. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) उंड्री येथील इंडस हॉस्पीटलमध्ये (Indus Hospital Undri) गुरुवारी (दि.22) रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हॉस्पिटलमधील 24 वर्षीय कंपाऊंडरने शनिवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरुन चारजण हॉस्पीटलमध्ये आले. पायाला जखम झाली असून उपचार करा असे सांगितले. उपचार करण्यासाठी फिर्यादी साहित्य
शोधत असताना आरोपींनी हॉस्पिटलच्या मेडिकल काऊंटरमधील (Medical counter) 8 हजार रुपये रोख, इंजेक्शन (Injection) व औषधे असा एकूण 13 हजार रुपये किमतीचा माल जबरदस्तीने काढून घेतला.

फिर्यादी यांनी विरोध केला असता एकाने डोक्यात खुर्ची फेकून मारली. तर इतर आरोपींनी लोखंडी
पाईपने फिर्यादी यांना बेदम मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी
शनिवारी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर.एस. मोहिते (API R.S. Mohite) करित आहेत.

हे देखील वाचा

Clubhouse यूजर्ससाठी वाईट बातमी ! डार्कवेबवर विकले जाताहेत 380 कोटी यूजर्सचे फोन नंबर !

Pimpri Crime | सफाई कामगारांचे पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपनीच्या संचालकासह 15 जणांवर FIR, 7 जणांना अटक


Income Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा, दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | thieves looted cash claiming to be injured beating the compounder of Indus Hospital Undri, FIR in kondhwa police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update