Pune Crime | नाताळनिमित्त चर्चमध्ये प्रर्थनेसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 25 लाखांचा मुद्देमाल चोरीला; महंमदवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नाताळ सण (Christmas) साजरा करण्यासाठी चर्चमध्ये रात्री प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून चोरट्यांनी तब्बल 24 लाख 77 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून (Stolen) नेला. ही घटना (Pune Crime) महंमदवाडी परिसरातील न्याती व्हिक्टोरिया सोसायटीत (Nyati Victoria Society) घडली.

 

याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय शनिवारी (दि.24) रात्री नाताळ सण साजरा करण्यासाठी बाहेर पडले. नाताळ निमित्त प्रार्थना (Pray) करण्यासाठी ते चर्चमध्ये गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी फिर्यादी यांच्या फ्लॅटच्या खिडकीची लोखंडी जाळी उचकटून घरात प्रवेश केला. (Pune Crime)

 

चोरट्यांनी कपाटात ठेवलेली 12 हजार रुपयांची रोकड,
हिरेजडित दागिने (Diamond Jewellery) असा एकूण 24 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
रात्री उशीरा घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.
फिर्यादी यांनी तात्काळ या घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle),
सहायक निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Suravse) यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Thieves raided the house of a family who had gone to church for Christmas, 25 lakhs of valuables were stolen; Incidents in Mahamadwadi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

MP Rahul Shewale | ‘खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न, माझी NIA कडून चौकशी करा’ – खासदार राहुल शेवाळे (व्हिडिओ)