Pune Crime | माजी गृह राज्यमंत्री आणि पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या ‘रिव्हॉल्व्हर’ची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे (Pune Congress President Ramesh Bagwe) यांना चोरट्याने हिसका दाखविला आहे. त्यांच्या कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर (Revolver Theft) चोरुन (Pune Crime) नेले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांनी खडक पोलीस (Khadak Police Station) ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहियानगर, गंज पेठ (Lohiyanagar, Ganj Peth) ते भवानी पेठेतील (Bhawani Peth) अरुणकुमार वैदय स्टेडियम (Arunkumar Vaidya Stadium Pune) दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. नेमका चोरीचा हा प्रकार कसा घडला, याबाबत बागवे यांना समजू शकलेले नाही.  त्यांनी आपले रिव्हॉल्व्हर (Revolver) कारमधील ड्रायव्हर सीटचे शेजारील सीटच्या मागील  कप्प्यामध्ये ठेवले होते. चोरट्याने बागवे यांच्या कारची बनावट चावी तयार करुन  किंवा कारचा दरवाजा उघडून कारमधील सीटमागील कप्प्यात ठेवलेले 1 लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन (Pune Crime) नेले. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

माजी गृह राज्यमंत्री बागवे यांच्या कारमधून रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Thieves snatch Revolver of Pune City Congress president Ramesh Bagwe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vodafone Idea | वोडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका ! दोन रिचार्ज प्लॅन मधून काढले Disney+Hotstar बेनिफिट्स

 

New Year Changes | 1 जानेवारीपासून GST, ATM ते LPG Gas Cylinder च्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होणार

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 3900 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलीस ठाण्यातील अधिकारी ‘ACB’च्या रडारवर, पुणे-पिंपरी पोलिस दलात प्रचंड खळबळ