Pune Crime | नागरिकांचे मोबाईल हिसकावणारे चोरटे गुन्हे शाखेच्या ताब्यात, 2.53 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या (Mobile Thief) तिघांना गुन्हे शाखा युनिट पाचने (Pune Police Crime Branch) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 10 गुन्हे उघडकीस आले असून 2 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.28) हडपसर येथे करण्यात आली. आरोपी दुचाकीवरुन येऊन नागरिकांचे मोबाईल (Pune Crime) हिसकावून नेत होते.
ऋषिकेश संजय देडे Rishikesh Sanjay Dede (वय-21 रा. कुंजीरवाडी ता. हवेली मुळ रा. मु.पो बादलो ता. अक्कलकोट जि. सोलापूर) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या दोन अल्पवयीन साथिदारांना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)
गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत असताना मोटरसायकलवरून पुणे शहरातील वेग-वेगळ्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल हिसकावणारा ऋषीकेश संजय दडे व त्याचे दोन अल्पवयीन साथिदार हडपसर येथे चोरलेले मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये आरोपींनी पुणे शहरातील हडपसर, येरवडा (Yerwada Police Station), लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station), यवत (Yavat Police Station), दिघी पोलीस ठाण्याच्या (Dighi Police Station) हद्दीत मोबाईल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar),
पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट (PSI Chaitali Gapat) पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर,
प्रताप गायकवाड, रमेश साबळे, दया शेगर, अमित कांबळे, राहुल ढमढेरे, किशोर पोटे, स्वाती गावडे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime | Thieves stealing citizens’ mobile phones are in the custody of the pune police crime branch, 2.53 lakh worth of valuables have been seized
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Diabetes मुळे शरीराच्या ‘या’ भागात होतात तीव्र वेदना, जाणून घ्या कसा दूर होईल त्रास