Pune Crime | गंगाधाम रोडवर लिफ्ट मागणार्‍यांनी मारहाण करुन चोरुन नेली दुचाकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुचाकीवरुन जाताना दोघांनी लिफ्ट मागितली म्हणून त्याने त्यांना लिफ्ट दिली. गंगाधाम रोडवर (Gangadham Road) सोडायला सांगून आडबाजूला गाडी थांबून दोघांनी चालकाला मारहाण (Beating) करुन दुचाकी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने वाहनचोरट्याला पकडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. (Pune Crime)

 

याप्रकरणी मार्केटयार्ड (Market Yard) येथील हमालनगरमध्ये राहणार्‍या एका 18 वर्षाच्या तरुणाने फिर्याद (गु. रजि. नं. 773/22) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित रामप्रताप वर्मा Rohit Rampratap Verma (वय 22, रा. गणेनगर, वानवडी) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरुन 24जुलै रोजी रात्री बारा वाजता साळुंखे विहार रोडवरुन जात असताना दोघा जणांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. रात्रीची वेळ असल्याने मदत करण्याच्या भावनेने त्यांनी दोघांना लिफ्ट दिली. त्यांनी अगोदर गंगाधाम चौकापर्यंत सोडा असे सांगितले. त्यानंतर पुढे आईमाता मंदिरसमोर सोडायला सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी तेथे घेऊन गेल्यावर त्यांनी गाडी थांबविली. तेव्हा दोघांनी त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील दुचाकी जबरदस्तीने चोरुन नेली. या प्रकाराने फिर्यादी तरुण घाबरुन गेला होता. त्याने हा प्रकार कोणालाही न सांगता घरी गेला होता. गुन्हे शाखेने वाहनचोरीच्या संशयावरुन रोहीत वर्मा याला पकडले, तेव्हा त्याच्याकडील फिर्यादीची गाडी चोरीचे असल्याचे लक्षात आले.

 

Web Title :- Pune Crime | Those who asked for a lift beat up and stole the bike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC Election 2022 | पुणे महापालिकेसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत उद्या, दिग्गज नेत्यांना बसणार धक्का

 

CM Eknath Shinde | ‘एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही’

 

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारकडून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना एका दिवसात दोन धक्के