Pune Crime | हॉस्पिटलविरूद्ध तक्रार केल्याने कुटूंब संपविण्याची धमकी, आठजणांविरूद्ध गुन्हा

पुणे- Pune Crime | अनधिकृत हॉस्पिटल सुरू करून रूग्णांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा आरोप करीत तक्रार केल्याचा राग आल्याने संबंधित डॉक्टरांसह आठजणांनी तरूणाच्या कुटूंबियाला संपविण्याची धमकी (Threat) दिली. ही घटना लोहगावमधील न्यू मातोश्री मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये (New Matoshree Multi Specialist Hospital) घडली. (Pune Crime)

डॉ. शशिकांत निकम (Dr. Shashikant Nikam), डॉ. विद्यानंद भिल्लारे (Dr. Vidyanand Bhillare), प्रकाश चव्हाण (Prakash Chavan), गोविंद चव्हाण (Govind Chavan), दीपक चव्हाण (Deepak Chavan), शशिकांत चव्हाण (Shashikant Chavan), भामाबाई चव्हाण (Bhamabai Chavan), सुनिता चव्हाण (Sunita Chavan) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नरेंद्र वाघमारे Narendra Waghmare (वय ३३) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात डॉ. शशिकांत आणि डॉ. विद्यानंद यांनी २०१४ मध्ये
न्यू मातोश्री मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू केले. त्याद्वारे रूग्णांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य
करून शासनाची फसवणूक (Cheating Case) केली. याप्रकरणी हॉस्पिटलची तक्रार करणाऱ्या नरेंद्र वाघमारे यांना
शिवीगाळ करून टोळक्याने त्यांच्या कुटूंबियांना संपविण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलिस (Lonikand Police) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Threat against family for complaining against hospital, crime against eight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | स्वराज्य पक्षांच्या 105 पेक्षा जास्त शाखांचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’