Pune Crime | अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पतीच्या मित्राकडून बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नोकरीनिमीत्त गावाकडून पुण्यात आलेल्या मित्राला रहायला जागा नसल्याने स्वत:च्या घरात काही दिवसांसाठी ठेवून घेतले. परंतु त्याच मित्राने गैरफायदा घेतला. मित्राची पत्नी अंघोळ करत असताना लपून व्हिडिओ (Bathing Video) काढला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी (Video Viral Threatening) देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार (Rape In Pune) केला. एवढेच नाही तर तिला ब्लॅकमेल (Blackmail) करुन पैसेही उकळले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) वाघोली परिसरात एप्रिल 2022 ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

याबाबत 27 वर्षीय पीडित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पतीच्या मित्रावर आयपीसी 376, 354 अ, 384, 385 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वाघोली परिसरात भाड्याच्या घरात राहते. महिलेच्या पतीने गावाकडच्या मित्राला काम मिळवून देण्यासाठी पुण्यात आणले होते. त्याला एका ठिकाणी काम मिळवून दिले होते. मात्र त्याला राहण्यास जागा नसल्याने महिलेच्या पतीने मित्राला घरी ठेवून घेतले. (Pune Crime)

दरम्यान, मित्र कामावर गेल्यानंतर फिर्यादी महिला आंघोळ करत असताना त्याने लपून महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडे पैशाची मागणी (Extortion Case) केली. सुरुवातीला त्याने 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याने आणखी साडेतीन लाख रुपये मागितले.
तसेच पैसे दिले नाहीतर व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली.
आरोपीच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे (PSI Rahul Kolpe) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Threat to go viral on bathing video, rape by husband’s friend; Shocking incident in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Interest On Saving Account | ‘या’ बँका देत आहेत सेव्हिंग्ज अकाउंटवर सर्वात जास्त व्याज, येथे चेक करा व्याजदर

Janhvi Kapoor Fitness | समोर आले जान्हवी कपूरच्या फिटनेसचे रहस्य, कशी बनली Chubby ते Curvy Baby?