Pune Crime | व्याज म्हणून दरमहा 50 हजार रुपये देत असतानाही बायका-मुलांना रस्त्यावर आणण्याची धमकी; पुण्याच्या कोंढव्यात तरुणाची आत्महत्या

पुणे : Pune Crime | फ्लॅट खरेदी करण्यासाठी दिलेल्या पैशाचे व्याज म्हणून दर महा ५० हजार रुपये देत असतानाही बायका मुलांना रस्त्यावर आणण्याची धमकी देऊन मित्रानेच त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) सुहास ननावरे (रा. धायरी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सचिन काळभोर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांची पत्नी कामिनी काळभोर (वय ३५, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
हा प्रकार २०१९ पासून ५ ऑगस्ट २०२० दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन काळभोर आणि सुहास ननावरे हे दोघे मित्र होते.
सचिन काळभोर यांनी फ्लॅट खरेदी करण्यासाठी सुहास ननावरे याच्याकडून ५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. व्याज म्हणून काळभोर दरमहा ५० हजा रुपये आरोपीला देत होते.
असे असतानाही पैशासाठी आरोपी काळभोर यांना शिवीगाळ करुन मुलाबाळांना व बायकोला रस्त्यावर आणण्याची धमकी देत.
तसेच सचिन काळभोर यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सचिन काळभोर यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime) केली.

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खातेधारकांना मिळणार ‘ही’ सुविधा, आता एक तासात काढा पैसे, जाणून घ्या नियम

Pune NCP | राष्ट्रवादीकडून बाणेर-बालेवाडी प्रभाग क्र.9 च्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Threatening to bring wives and children on the streets despite paying Rs 50,000 per month as interest; Suicide of a youth in Kondhwa, Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update