क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | तरुणीचा पाठलाग करुन अ‍ॅसिड टाकून मारण्याची धमकी; पुण्याच्या खडकी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणीचा पाठलाग करुन तिने मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्यावर तिला अ‍ॅसिड टाकून (Acid Attack) जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police) सोहेल शफिक मुलाणी (वय २३, रा. पिंपळेगुरव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी खडकी येथे राहणार्‍या एका १८ वर्षाच्या तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२१ पासून ३१ जानेवारीपर्यंत सुरु होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या औंध रोडला रहात आहेत.
त्या पाटील कॉम्पलेक्स बसस्टॉपवरुन घोलप कॉलेज येथे जातात.
त्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा सोहेल याने माहिती करुन घेऊन तो त्यांचा पाठलाग करु लागला.
फिर्यादी यांचा कॉलेज तसेच त्या नोकरी करीत असलेल्या ठिकाणी तो येऊ लागला.
सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्याची भीड चेपली.
३१ जानेवारी रोजी फिर्यादी या परिहार चौकात असताना त्याने फिर्यादी यांना अडवून त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला. त्यांनी नंबर देण्यास नकार दिल्यावर अ‍ॅसिड टाकून मारुन टाकण्याची धमकी दिली. या घटनेने घाबरुन फिर्यादी यांनी खडकी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद (Pune Crime) दिली असून सहायक पोलीस निरीक्षक भाबड तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Threatening to chase the young woman and throw acid on her Incidents in the Khadki area of ​​Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

Back to top button