Pune Crime | जादुटोणाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रारीची धमकी; पुजार्‍याला लुबाडणार्‍या दोघांना अटक; महिलेसह 3 जणांवर खंडणीचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका पुजार्‍यास तुम्ही भोंदुगिरी करता, जादुटोणा करता, तुमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची धमकी देऊन त्यांना १ लाख रुपयांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) एका महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल (extortion case) करुन दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

विनायक अधिकराव लावंड आणि अभिजित गोपीचंद दरेकर (दोघेही रा. संभाजीनगर, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी लोणीकंद मधील एका ५२ वर्षाच्या पुजार्‍यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २९ सप्टेबर ते ३ डिसेबर दरम्यान घडला आहे. फिर्यादी हे पुजारी आहेत. आरोपींनी त्यांना मोबाईलवर फोन करुन ते प्रत्यक्ष भेटून धमकावले. ‘‘तुम्ही भोंदुगिरी करता, जादुटोणा करता, अशी मी तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे. पोलीस तुम्हाला अटक करतील,’’ अशी भिती घातली. तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. ‘‘तुमची पोलिसांकडे तक्रार करायची नसेल तर तुम्ही मला ५० हजार रुपये द्या, ’’असे धमकावले. त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर ४५ हजार रुपयांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी घेतली. तसेच ५ हजार रुपये घेतले. त्यांच्या या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव (Pune Crime) घेतली. त्यानुसार दोघे जण पैसे घेण्यासाठी या पुजार्‍यांच्या घरी आले असताना शनिवारी सायंकाळी दोघांना लोणीकंद पोलिसांनी पकडले. पोलीस उपनिरीक्षक टेंगले तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Threatening to lodge a complaint with the police alleging witchcraft; Two arrested for robbing priest; Ransom charge against 3 persons including a woman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले; पुण्यातील पाषाण परिसरातील घटना

Pune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा धाक दाखवून चालकाला लुबाडले

Omicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला, ओमिक्रॉन नाही तर आढळला कोरोनाचा ‘हा’ व्हेरिएंट

Thane Crime | धक्कादायक ! 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी लग्न; नंतर 27 वर्षांच्या जावयाकडून सासूवर बलात्कार

Electricity Mobility Promotion Policy | गाडी खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर ! ‘हे’ सरकार देतंय 3 लाखापर्यंत सबसिडी, जाणून घ्या

Pune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत; व्याजाचे पैसे न दिल्याने केला होता खून