Pune Crime | IPL च्या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या हिस्ट्रीशीटरसह तिघांना अटक, 25 लाखांची रोकड जप्त; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा (IPL Betting) घेणाऱ्या चौघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन तिघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यामध्ये एका हिस्ट्रीशीटरचा (History Sheeter) समावेश आहे.
ही कारवारी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Police Crime Branch) गुंडा विरोधी पथकाने एका फ्लॅटवर छापा टाकून केली.
या कारवाईत (Pune Crime) पोलिसांनी 25 लाख रुपये, 8 मोबाईल, बेटिंग खेळण्यासाठी – घेण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.
अटक करण्यात आलेल्या हिस्ट्रीशीटरने आपले ‘कॉन्टॅक्ट’वर पर्यंत असल्याचे सांगत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
(Three arrested for betting on IPL match, Rs 25 lakh cash seized; Action of Pimpri Chinchwad Police Crime Branch)

 

आयपीएल क्रिकेट सामान्यांवर (IPL Cricket Match) काळेवाडी (Kalewadi) परिसरातील एका फ्लॅटमध्ये बेटिंग सुरु असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांना मिळाली.
त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने काळेवाडी येथील राजवाडेनगर, वैभव पॅराडाईज (Vaibhav Paradise), पहिला मजला फ्लॅट नं. 106 फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी सनी उर्फ भूपेंद्र चरणजीतसिंग गिल Sunny alias Bhupendra Charanjit Singh Gill (वय – 38 रा. काळेवाडी), रिक्की राजेश खेमचंदानी Ricky Rajesh Khemchandani (वय – 36 रा. डिलक्स थिएटरमागे, पिंपरी), सुभाष रामकिसन अगरवाल Subhash Ramkishan Agarwal (वय – 57 रा. पिंपरी या तिघांना अटक केली आहे.
तर सनी सुखेजा (Sunny Sukheja) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक हजरतअली पठाण (ASI Hazrat Ali Pathan) यांनी रविवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

अटक करण्यात आलेल्या सनी गिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.
आयपीएल सिझन सुरु झाल्यापासून शहरातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुंडा विरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर (ACP Prashant Amritkar) हे घटनास्थळी दाखल झाले.

 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, आयपीएलच्या गुजरात टायटन (Gujarat Titan) आणि दिल्ली कॅपिटल (Delhi Capital) या सामन्यांवर बेटिंग सुरु असल्याची माहिती मिळाली होती.
काळेवाडी येथील एका सोसायटीमध्ये घरात बेटिंग सुरु असलेल्या बेटिंगवर गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने (Harish Mane) आणि त्यांच्या पथकाने छापा मारला.
घरात रंगेहाथ बेटिंग घेताना – खेळताना पोलिसांनी पकडले.
मोठ्या प्रमाणात पैसे आणि इतर साहित्य आढळून आले.

 

पोलिसांकडून कारवाई केली जात असताना आरोपी सनी गिल याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
मला हात लावायचा नाही, माझी ओळख वर पर्यंत आहे. माझ्यावर कारवाई केल्यास चांगले होणार नाही, अशी धमकी पोलिसांना देऊन पोलिसांसोबत झटापट केली.
याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर वेगळा गुन्हा दाखल केला आहे.

 

ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने, हजरत पठाण, पोलीस नाईक विजय तेलेवार, मयुर दळवी, सुनील चौधरी,
तौसिफ खान यांनी केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Three arrested for betting on IPL match Rs 25 lakh cash seized Action of Pimpri Chinchwad Police Crime Branch CP IPS Krishna Prakash

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा