Pune Crime | दत्तवाडी परिसरात रिक्षा चालकाचा खून करणार्‍या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | किरकोळ वादातून रिक्षाचालकाच्या (Rickshaw Driver) डोक्यात कोयत्याने वार करून खून (Murder In Pune) करणार्‍या तिघांना दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) अटक (Arrest) केली आहे. दारू पिउन तुम्ही संपला आहात, तुमच्यामध्ये दम राहिलेला नाही, असे म्हटल्याच्या राग आरोपींना होता. त्यामुळे त्यांनी रिक्षाचालकाचा खून केल्याची कबुली दिली आहे. खून करणार्‍या तिघांना दत्तवाडी पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली आहे. (Pune Crime)

 

विनोद वामन आल्हाट Vinod Vaman Alhat (वय ३७), अनिकेत बाळु नांगरे Aniket Balu Nangare (वय २४), आकाश संतोष देवरुखे Akash Santosh Devrukhe (वय २६. तिघेही रा. दांडेकर पुल, दत्तवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अक्षय रावडे Akshay Rawde (रा. धायरी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना ८ ऑक्टोबरला जनता वसाहत परिसरामध्ये घडली होती.

 

किरकोळ वादातून रिक्षा चालकाचा खून केल्याची घटना दत्तवाडीत घडली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan) यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomene), उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (Sub-Inspector Chandrakant Kamthe) तपास करीत होते. त्यावेळी रिक्षाचालकाचा खून करणारे तिघेजण दांडेकर पुलाखाली थांबल्याची माहिती पोलीस अमलदार अमित सुर्वे, अमोल दबडे, प्रमोद भोसले यांना मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. (Pune Crime)

चौकशीत रिक्षाचालक अक्षय रावडे हा आरोपींना तुम्ही दारु पिवुन संपलेला आहे,
तुमच्यात काही दम राहीलेला नाही , तुम्ही काय करु शकत नाही असे बोलला होता.
त्याचा राग आरोपींना आल्यामुळे त्यांनी अक्षयला दुचाकीवर बसवून जनता वसाहत कॅनॉल रोड परिसरामध्ये नेले.
त्याच्या डोक्यात व हातावर कोयत्याने वार करुन खुन केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर आयुक्त राजेंद्र डहाळे (Additional Commissioner Rajendra Dahale),
उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (Deputy Commissioner Poornima Gaikwad),
एसीपी सुनिल पवार (ACP Sunil Pawar), वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरिक्षक विजय खोमणे,
उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, किशोर तनपुरे, कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे-पाटील,
पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अनिस तांबोळी, प्रमोद भोसले, किशोर वळे, ज्ञानेश्वर शिंदे, अमित चिव्हे, प्रशांत शिंदे सद्दाम शेख यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Three arrested for murdering a rickshaw driver in Dattawadi area Crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dhanushyaban Symbol | ‘जनतेसोबत सैनिक गेले, इतके अनर्थ…’, धनुष्यबाण चिन्हावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्लांची महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर होणार नियुक्ती?

MP Supriya Sule | ‘हम बेवफा हरगीज ना थे, पर…’ सुप्रिया सुळेंचा टोला, म्हणाल्या-‘मला शिंदे गटाची काळजी वाटते’