Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Baramati Government Medical College) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून खिशातील 15 हजार रुपये चोरून त्याचा नग्न व्हिडिओ (Nude Video) काढला. तसेच जबरदस्तीने एटीएम सेंटरमध्ये (Pune Crime) नेऊन पैसे काढून घेतले. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी (Baramati Taluka Police Station) तीन जणांना अटक केली आहे.

राहुल धोंडीबा हुगाडे (वय 23, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती), सुमित किशोर पवार (वय 24, रा. बांदलवाडी, ता. बारामती), भूषण भास्कर रणसिंग (वय 20, रा. मार्केट यार्ड, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. हा प्रकार रविवारी (दि.4) सायंकाळी घडला होता. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector Prabhakar More) व सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे (API Rahul Ghuge) यांनी ही माहिती दिली. (Pune Crime)

काय आहे प्रकार?

विद्यार्थी (वय 21) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत असून, वसतिगृहात राहतो. रविवारी (दि.4) सायंकाळी विद्यार्थी बारामती येथील एका मॉलमध्ये खरेदी करून दुचाकीवरून वसतिगृहाकडे निघाला होता. काही अंतरावर चोरट्यांनी त्याला आडवून शिवीगाळ करून दमदाटी करत खिशातील 15 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. (Pune Crime)

त्यानंतर चोरट्यांचे इतर दोन साथीदार त्या ठिकाणी आले. त्यांनी विद्यार्थ्याला जिवे मारण्याची धमकी
(Threats to Kill) देत दुचाकीवर बसवून गोरड हॉस्पिटलजवळ उसाच्या शेतात नेले.
त्या ठिकाणी त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला.
चोरट्यांनी विद्यार्थ्याला विवस्त्र करून त्याचा व्हिडिओ बनवला.
हा व्हि़डिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रात्री साडेआठच्या सुमारास एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये नेले.
त्या ठिकाणी विद्यार्थ्याला धमकावून डेबिट कार्डचा पासवर्ड घेऊन 14 हजार 500 रुपये काढून घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (SDPO Ganesh Ingle) यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

Web Title :- Pune Crime | three arrested for robbing and taking nude video of a medical college student pune baramati crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Ayurveda And Smoking | धुम्रपानाचे व्यसन सुटत नाही का? मग जाणून घ्या आयुर्वेद तज्ज्ञांकडून यावर उपाय

Pinched Nerve Remedies | शरीरातील नस दबल्याने गंभीर वेदना होत आहेत का? मिनिटात आराम देतील ‘हे’ 5 उपाय, आखडण्याची समस्या होईल दूर