Pune Crime | 13 वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेलं; अश्लिल व्हिडिओ पाठविणारे तिघे आले चांगलेच ‘गोत्यात’

पुणे : Pune Crime | अल्पवयीन १३ वर्षाच्या मुलीला फुस लावून गणपती दाखविण्याचा बहाणा करुन पळवून नेऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग (molestation case) केला. तसेच तिला अश्लिल व्हिडिओ पाठविणार्‍या व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) देणार्‍या तिघांना हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक केली आहे.

अविराज चंद्रकांत कांबळे Aviraj Chandrakant Kamble (वय २१), शाहीद दादुसाहब शेख Shahid Dadusaheb Shaikh (वय २२), तन्वीर अहमद बंकापूर Tanveer Ahmed Bankapur (वय २१, सर्व रा. महात्मा फुले वसाहत, गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची (Pune Crime) नावे आहेत. याप्रकरणी खडकी बाजार (Khadki Bazar) येथे राहणार्‍या एका महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २० मे ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान हडपसर, तसेच खडकीबाजार येथे घडला आहे.

आरोपी अविराज कांबळे याने फिर्यादी यांच्या १३ वर्षाच्या मुलीचा पाठलाग करुन तिला एकटे बघून तिचा विनयभंग केला. तिला मोबाईलवर मेसेज व फोन करुन वारंवार कुटुंबियांना जीवे मारण्याची तसेच स्वत:चा जीव देण्याची धमकी देऊन तिच्या मनात भिती निर्माण केली. फिर्यादी यांच्या मुलीला वारंवार कधी हडपसर, तर कधी खडकी येथे भेटायला बोलावून तिच्याशी अश्लिल वर्तन केले. आरोपींनी संगनमताने गणपती दाखविण्याचा बहाणा करुन खडकी येथील राहते घरातून हडपसर येथे पळवून नेले. शाहीद शेख याने तेथे तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचे व्हॉटसअ‍ॅपवरुन फिर्यादींच्या मुलीच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ पाठवून तिच्या मनात लज्जा निर्माण केली. पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Three arrested for seducing a minor girl and sending videos

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update