Pune Crime | पुण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर ऊर्फ लालबादशाह खून प्रकरणात तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | काँग्रेसचा कार्यकर्ता (Congress Activist) आणि बांधकाम व्यावसायिक (Builder) समीर हुसेन मनूर याचा खून (Murder) केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) सोमवारी रात्री उशिरा तिघांना अटक (Arrest) केली. आर्थिक वादातून त्यांनी समीर ऊर्फ लालबादशाह हुसेन मनूर Sameer alias Lalbadshah Hussain Manoor (वय ३२, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रुक) याचा खून (Pune Crime) केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मेहबुब सैफान बलुरंगी (वय ३३, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), निलेश सुनिल कुंभार (वय ३०, रा. लक्ष्मी कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) आणि सुफियान फैयाज चौरी (वय १९, रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात (Pune Crime) घेण्यात आले आहे.

याप्रकरणी समीर याचे वडिल हुसेनसाब महंमदसाब मनुर (वय ६७, रा. काळुबाईनगर, आंबेगाव बुद्रक) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

समीर हा पूर्वी जनता वसाहत (janta vasahat pune) येथे रहायला होता. मेहबुब याची जनता वसाहतीत टपरी आहे. तो व्याजाने पैसे देत असे. तसेच भिशीही चालवित असे. समीरला मेहबुब याने संतोषनगर येथील प्लॉटच्या बांधकामाचे काम दिले होते. त्या व्यवहारापोटी मेहबुब याने पाच लाख रुपये दिले होते. त्यापैकी अडीच लाख रुपये समीरने परत केले होते. उरलेले अडीच लाख रुपये परत करावे, अशी मेहबुब समीरकडे वारंवार मागणी करीत होता. त्यावरुन दोघांमध्ये यापूर्वीही वादावादी झाली होती. या आर्थिक व्यवहारावरुन मेहबुब याने इतर तिघांशी संगनमत करुन कट (conspiracy of murder) रचला.

समीर हा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बुलेटवरुन दत्तनगर येथील कार्यालयात निघाला होता.
तो चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर ६ गोळ्या झाडल्या.
डोक्यात गोळी लागल्याने समीर बुलेटवरच पडला.
त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला.
भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth) याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

Web Title : Pune Crime | Three arrested in Pune Congress worker and builder
Sameer alias Lalbadshah Hussain Manoor murder case bharti vidyapeeth police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ‘या’ सरकारी योजनेत दरमहिना जमा करा 210 रुपये; पती-पत्नी दोघांना मिळेल 10,000 रू. पेन्शन, समजून घ्या गणित

OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका ! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे

Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

Shashi Tharoor | शिवसेनेच्या खा. प्रियंका चतुर्वेदींनंतर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही राजीनामा; सोडला TV शो