Pune Crime | युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या GST टोळी प्रमुखासह तिघांना अटक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | पुणे शहरातील (Pune Crime) स्वारगेट परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला करुन फरार झालेल्या GST टोळी प्रमुखासह तिघाजणांना स्वारगेट पोलिसांनी अटक (arrest) केली आहे. ही घटना स्वारगेट हद्दीमध्ये डायस्प्लॉट भागात घडली होती. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने युवकावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टोळी प्रमुख गोविंदसिंग टाक (रा. डायस्प्लॉट गुलटेकडी), राहुल उर्फ लल्लन कांबळे, गणेश तुपे (दोघे रा. मंगळवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
तरुणावर खूनी हल्ला करुन फरारी टोळी प्रमुखासह साथीदारांची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal) आणि पथकाकडून घेण्यात येत होती.
त्यावेळी पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भाकरे यांना आरोपींची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर
(Senior Police Inspector Balasaheb Kopner), पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव
(Police Inspector (Crime) Somnath Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार कुंभार,
दळवी, साळवे, कांबळे, शेख, खेंदाड, ढावरे, तिटमे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Three arrested, including GST gang leader, for assaulting a youth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Positive Payment Systems | 15 ऑगस्टपासून बदलणार आहेत बँक अकाऊंटचे ‘हे’ नियम, जाणून घ्या अन्यथा अडकू शकते तुमचे पेमेन्ट

Mumbai Crime | Instagram वर केली मैत्री, अश्लील चित्रीकरण करून उकळले पैसे

India and China | भारत-चीनमधील पुर्व लडाखमधील सीमावाद जवळपास संपुष्टात, गोगरा हाईट्समधून मागे हटली इंडिया आणि चायनाची आर्मी