Pune Crime | नाना पेठेत दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगमधील तीन फरार आरोपींना गुन्हे शाखेकडून हत्यारासह अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोयता घेऊन दहशत माजवल्याचा प्रकार पुण्यातील नाना पेठेत 1 जानेवारी रोजी घडला होता. दहशत माजवणाऱ्या टोळीतील पाच जणांना समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) पोलिसांनी यापूर्वीच अटक (Arrest) केली आहे. तर फरार असलेल्या इतर तीन साथिदारांना पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit 1) पथकाने अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई (Pune Crime) ओंकारेश्वर मंदीराच्या मागील नदी पात्रातील धोबी घाटालगत केली.

 

गगनदीप मिशन, अमन खान (दोघे रा. नाना पेठ, पुणे), अरसलन तांबोळी, मंगेश चव्हाण, गणेश पवार (तिघे रा. रविवार पेठ, पुणे) यांना समर्थ पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तर गुन्हे शाखा युनिट एकने मयुर दत्तात्रय थोरात (वय-23) सुजल राजेश टापरे (वय-19 दोघे रा. नाना पेठ, डोके तालीम जवळ, पुणे) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 2200 रुपये किमतीचे पालघन, कोयता व सुरा जप्त केला आहे. (Pune Crime)

एक जानेवारी रोजी काही तरुणांमध्ये आपापसात किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते.
या भांडणाचा मनात राग ठेऊन या आरोपींनी नाना पेठेतील (Nana Peth) परिसरात दुचाकीवरुन जाऊन हातात कोयते घेऊन दहशत माजवली होती.
घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तापासून पाच जणांना अटक केली होती. तर त्यांचे इतर साथिदार फरार झाले होते.

 

फरार आरोपींचा समांतर तापस सुरु असताना गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार
यांना आरोपी नदीपात्रातील धोबी घाटालगत लपुन बसल्याची माहिती मिळाली.
तसेच त्यांच्याकडे हत्यार असल्याचे माहिती मिळाली.
पोलिसांनी नदी पात्रात सपाळा रचून मयुर थोरात, सुजल टापरे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
पुढील कारवाईसाठी आरोपींना समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Three fugitive accused of the Koyta gang, who spread terror in Nana Peth, were arrested by the crime branch along with a weapon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)

Ajit Pawar on Nitesh Rane | टिल्ल्या लोकांनी मला शिकवू नये; अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा

IPS Deven Bharti | वरीष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बृहन्मुंबईच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती