क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस (Anti Corruption Police) असल्याचे सांगून नगर रचना उपसंचालकांच्या घरात शिरुन त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केलेला हा खरोखरच पोलीस कर्मचारी आणि यापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात काम केलेला पोलीस असल्याचे निष्पन्न झाले आहे. वारजे पोलिसांनी (Warje Police) या नाशिकच्या पोलीस (Nashik Police) कर्मचार्‍यासह त्याची पत्नी व साथीदार अशा तिघांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

गणेश संतोष पाटील Ganesh Santosh Patil (वय 41) यांची पत्नी जयश्री गणेश पाटील Jayshree Ganesh Patil (वय 37, दोघे रा. इंद्रानगर, नाशिक), हर्षल श्रीकांत घाग Hershal Shrikant Ghag (वय 34, रा. शिवाईनगर, ठाणे) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. गणेश हा सध्या नाशिक पोलीस दलात असून त्याने सहा वर्षापूर्वी मुंबईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागात (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) काम केले होते. (Pune Crime)

गेल्या शुक्रवारी 24 जून रोजी सकाळी सहा वाजता अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगत तिघे जण नगर रचना उपसंचालकांच्या कर्वेनगर येथील घरात शिरले होते. त्यांनी त्यांचे मोबाईल काढून घेऊन कारवाईचा बहाणा केला. मात्र, ही माहिती उपसंचालकाच्या मुलाने गस्तीवर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांना दिली. वारजे पोलीस तेथे पोहचल्यावर त्यांनी अधिकार्‍यांना फोनचा बहाणा करुन तेथून पलायन केले होते.

 

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी परिसरातील (Pune Police) सीसीटीव्हीची तपासणी केली.
त्यात एक कार नगररचना संचालकांच्या घराबाहेर आढळून आली होती.
तिचा नंबर मिळाल्यावर शोध घेतला असता ती घाग याची असल्याचे समजले.
त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गणेश पाटील याचे नाव सांगितले.
पुण्यातील एका नगररचना उपसंचालकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची माहिती गणेश पाटील याला माहिती होती.
त्याच्या घरी मोठे घबाड सापडल्याने हे उपसंचालकही आपल्या जाळ्यात सापडतील,
असे वाटल्याने पाटील याने हा डाव टाकला होता.

 

Web Title :-  Pune Crime | Three persons, including a Nashik police officer, who tried to rob the Deputy Director of Town Planning by claiming to be anti-corruption police, were arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्याच ट्विटची सर्वत्र चर्चा; म्हणाल्या…

 

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

 

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

Back to top button