Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मागील काही महिन्यांपासून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर (Pune Crime) आला आहे. अशातच आता पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीवर सख्ख्या अल्पवयीन भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलाने युट्युबवर अश्लील व्हिडिओ (Pornographic videos) पाहून अत्याचार केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. याप्रकरणी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संबंधित कुटुंब हे परराज्यातील आहे. पीडित चिमुकली आणि मुलाचे आई-वडील हे घर चालण्यासाठी दिवसभर राबत आहेत. आईवडिल घरात नसल्याने तीन वर्षीय मुलीचा सांभाळ तिचा भाऊ करत होता. दरम्यान, वडिलांकडे असलेल्या मोबाईलमध्ये मुलगा अश्लील व्हिडिओ बघत असत. असं पोलिसांनी म्हटलं आहे. तर, यातूनच ऑगस्ट महिन्यात घरात कोणी नसताना आपल्या ३ वर्षीय बहिणीवरच त्याने लैंगिक (Pune Crime) अत्याचार केले.

तर, त्याच महिन्यात आईला कोरोनाची बाधा झाल्याने त्या त्यांच्या मूळगावी गेल्या होत्या.
तिथे मुलीची तब्येत बरी नसल्याने त्या तेथील डॉक्टरांकडे गेल्या. त्यावेळी डॉक्टरांनी औषध उपचार करून पाठविले.
काही दिवसांनी त्या पिंपरी-चिंचवडमध्ये परतल्या, तेव्हाही मुलीची तब्बेत बरी नव्हती. त्यामुळे शासकीय रुग्णालयात तिला दाखवण्यात आले,
तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. दरम्यान, ‘भैयाने गंदा काम किया’ अस सतत चिमुकली म्हणत असल्याने मुलावर संशय आला.
अखेर मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं असता त्यावेळी हे कृत्य त्यानेच केले असल्याचं उघडकीस आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी मुलाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अधिक तपास भोसरी पोलीस (Bhosari Police) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | three year old girl sexually abused by her brother after watching a video on youtube

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Booster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार? शास्त्रज्ञांनी केली मोदी सरकारकडे शिफारस

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

India First Electric Cruiser Bike | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर