Pune Crime | अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक अत्याचाराचा उलगडा; मोबाईलमधील अश्लील क्लिपनं गुन्ह्याची उकल, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील तळजाई पठार परिसरातून ताब्यात घेतलेल्या युवकाच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ क्लिप (Pornographic video clips) सापडली (Pune Crime) आहे. यावरु 3 जणांनी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. यानंतर आरोपींना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. ईश्वर शिंदे (Ishwar Shinde) (वय 20), कुणाल भांगरे (Kunal Bhangre) (वय 19) आणि निलेश नेटके (Nilesh Netke) (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी की, आरोपी ईश्वर शिंदे हा तळजाई पठार परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद अवस्थेत सापडला होता. त्याच्या मोबाईलमध्ये 2 व्यक्ती एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार करत असल्याची क्लिप सापडली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही क्लिप त्यानेच रेकॉर्ड केल्याचे सांगितले. सहकारनगर पोलिसांनी पीडित मुलाचा शोध घेतला. यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर, आरोपींनी यावर्षी दिवाळीच्या कालावधीत या अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीत आढळले. ही घटना हवेली पोलीस ठाण्याच्या (Haveli Police Station) हद्दीत घडल्याने हा गुन्हा हवेली पोलिसांकडे वर्ग केला गेला आहे. (Pune Crime)

दरम्यान, सदरची कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan), वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण (API Mohsin Pathan), पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे (PSI Shivaji Bunge) आणि इतर कर्मचा-यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Three youths arrested in a sodomy case sahakarnagar police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक; 1 पिस्टल 2 काडतुस जप्त

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला बंगळुरूमधून अटक, समोर आलं सुशांतसिंग ‘कनेक्शन’

Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना ! पैशाच्या देण्या-घेण्यातून तिघांनी जीवलग मित्राची केली निर्घृण हत्या

 

Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुधीर रामचंद्र आल्हाटला अटक; माहिती अधिकार कार्यकर्त्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध FIR