Pune Crime | एकाच दिवशी 9 जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 80 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी आणि शहरात कायदा सुव्यवस्था (Law and Order) टिकून ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 80 टोळ्याविरुद्ध कारवाई करुन गुन्हेगारांची रवानगी कारागृहात केली आहे. पुण्यात (Pune Crime) हडपसर (Hadapsar Police Station), कोंढवा (Kondhwa Police Station), चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandan Nagar Police Station) हद्दीत एकाच दिवसात 9 जबरी चोरी (Robbery) करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 80 आणि चालु वर्षात 17 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

ओंकार विनोद मसाळ उर्फ हर्षद सलीम शेख Omkar Vinod Masal alias Harshad Salim Sheikh (वय-22 रा. जुना बाजार, मंगळवार पेठ, पुणे), आशिष उर्फ गुड्डु रविंद्र चव्हाण Ashish alias Guddu Ravindra Chavan (वय-23 रा. शाईन बेकरीजवळ, रामटेकडी, हडपसर) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

आरोपींनी 5 मे रोजी पुणे-सोलापूर रोडवरील (Pune-Solapur Road) आकाशवाणीच्या समोर फिर्यादी यांना अडवून चाकूचा धाक दाखवून मोबाईल पैसे जबरदस्तीने काढून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या छातीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले होते. फिर्यादी यांनी डिओ गाडीवरील दोन अनोळखी व्यक्तींविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी दोघांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी ओकार विनोद मसाळ उर्फ हर्षद सलीम शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी वानवडी (Wanwadi Police Station), हडपसर, लोणीकंद (Lonikand police station), मुंढवा (Mundhwa police station), खडक (Khadak police station), फरासखाना (Faraskhana Police Station), मार्केटयार्ड (Market Yard Police Station), जामखेड (Jamkhed Police Station), अहमदनगर पोलीस ठाण्यात (Ahmednagar Police Station) 16 गुन्हे दाखल आहेत.

आरोपींनी स्वत:चे व टोळीचे वर्चस्व रहावे यासाठी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. यावरुन हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आयपीसी 394.34 महाराष्ट्र पोलीस कलम (Maharashtra Police Act) 37(1) सह 135 यामध्ये मोक्का कायद्याची कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग बजरंग देसाई (Hadapsar Division ACP Bajrang Desai) करीत आहेत.

आयुक्तांची 80 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 80 तर चालु वर्षात 17 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 नम्रता पाटील,
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule),
पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde) ,पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (Police Inspector Vishwas Dagle), पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर (PSI Sachin Gadekar), पोलीस अंमलदार प्रविण शिंदे,
बाबासाहेब शिंदे, गिरीश एकोर्गे यांनी केली.

Web Title : Pune Crime | Till Date 80th Action Taken By Pune Police Commissioner Amitabh Gupta

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त