Pune Crime | दहशत पसरविण्यासाठी टोळक्याने केला लोहगाव परिसरात गोळीबार, 3 राऊंड केले फायर

पुणे : Pune Crime | दारु पिल्यानंतर आपण भाई आहोत, हे दाखवून देण्यासाठी चौघा जणांच्या टोळक्याने लोहगावात (Lohegaon दोन ठिकाणी गोळीबार करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एकाच वेळी दोन ठिकाणी गोळीबारांच्या घटना रात्री घडल्याने एकच खळबळ उडाली होती. (Pune Crime)

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) नितीन सकट (वय २१), गणेश राखपसरे (वय २१, दोघे रा. राखपसरे वस्ती, लोहगाव) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लोहगावातील तुकाराम महाराज मंदीर चौक व गणपती चौक या ठिकाणी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सकट व गणेश राखपसरे यांच्याविरुद्ध यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत.(Pune Crime)

दोघे जण त्यांच्या दोन साथीदारांसह दारु पिले. त्यानंतर आपण इथले भाई आहोत, अशी त्यांची बोलणी झाली. आपला दरारा दाखविण्यासाठी ते मोटारसायकलवरुन प्रथम संत तुकाराम मंदीर चौकात आले. तेथे नितीन सकट याने आपल्याजवळील पिस्तुल बाहेर काढले. त्यातून हवेत २ गोळ्या झाडल्या. तेथे थांबलेल्या लोकांना ‘कुणी आमच्या वाटेला गेले तर आम्ही एक एकाला गोळ्या घालू़ कोणालाही जीवंत सोडणार नाही’, असे ओरडून दहशत निर्माण केली. त्यानंतर ते मोटारसायकलवरुन गणपती चौकात आले. तेथे नितीन सकट याने पुन्हा आपल्याकडील पिस्तुलातून हवेत १ गोळी झाडली. तेथे सुद्धा मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन दहशत माजविली. लोकांच्या जीवनास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन ते पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गजानन पवार, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप,
पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, शांतमल कोळ्ळुर व पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली.
पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून विमानतळ पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title :-Pune Crime | To spread terror, the gang fired in Lohgaon area, fired 3 rounds

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी जितेंद्र आव्हाड सुप्रीम कोर्टात; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर…?”

Maharashtra Karnataka Border Issue | कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी काढली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा