Pune Crime | तोतया अँटी करप्शनची रेड पोलिसांच्या दक्षतेने टळली; पोलिसांना पाहून बनावट पोलिसांनी ठोकली धुम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आम्ही अँटी करप्शनचे पोलीस (Anti Corruption Police) असल्याचे सांगून नगर रचना उपसंचालकाच्या (Deputy Director of Urban Planning) घरात शिरुन तोतया पोलिसांनी त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याची माहिती गस्तीवर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकांना (PSI) मिळाली, त्यांनी तेथे जाऊन चौकशी करण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा या तोतयांनी पोलीस अधिकार्‍यांनाच आम्हाला कोणतीही कल्पना न देता कसे आलात असे म्हणून वरिष्ठांना फोन करण्याचा बहाणा करुन त्यांनी धुम ठोकली. पोलिसांनी (Pune Police) वेळीच हस्तक्षेप केल्याने एका वरिष्ठ अधिकार्‍याला (Pune Crime) लुटण्याचा प्रयत्न फसला.

 

याप्रकरणी नगर रचना विभागाचे उपसंचालकांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साध्या वेशातील सावंत व पोलीस गणवेशातील एक पुरुष व महिलेवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कर्वेनगरमधील दत्त दिगंबर कॉलनीत शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता घडला.(Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी (ED), सीबीआय (CBI) हे कोठेही छापा घालायचा असला की पहाटेच जातात. त्याप्रमाणे हे तोतया अधिकारी व पोलीस सकाळी साडेसहा वाजता या उपसंचालकांच्या घरी गेले. त्यांनी आम्ही मुंबई अँटी करप्शन (Mumbai Anti Corruption) येथून आलो असल्याचे सांगितले. 23 जून रोजी तुमच्या  ऑफिसमध्ये काय झाले याची विचारणा केली. त्यांनी त्यांच्याकडील एका व्हिडिओ दाखवून त्यामध्ये एक इसम झोन दाखल्याबाबत आला होता. त्याबाबत फिर्यादीने आरोपीना माहिती दिली. त्यावर या तोतयाने तुमच्या ऑफिसमधील एकाने झोन दाखल्यासाठी आलेल्याकडे पैशांची मागणी करुन काही रक्कम स्वीकारली. तसेच तुमचे नाव देखील आले आहे. तुम्हाला त्यात अटक करुन तुमची प्रॉपर्टी जप्त (Property Seized) करावी लागेल, असे सांगितले. हे तुम्हाला नको असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील, असे तो तोतया अधिकारी बोलला.

या वेळेत फिर्यादी यांचा मुलगा घरातून बाहेर आला. तो सोसायटीच्या बाहेर आला असताना
वारजे पोलीस ठाण्याच्या पोलीस महिला उपनिरीक्षक पाटील या गस्त घालत तेथून जात होत्या त्यांना या मुलाने सर्व प्रकार सांगितले.

 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरु असेल तर त्यात स्थानिक पोलीस हस्तक्षेप करीत नाहीत.
परंतु, पाटील यांना संशय वाटल्याने त्या मुलाबरोबर त्यांच्या घरी आल्या. पोलिसांना पाहिल्यावर या तोतया अधिकार्‍याने त्यांच्यावरच रुबाब दाखविण्याचा प्रयत्न केला.
त्याने पाटील यांना तुम्ही आम्हाला कोणतीही कल्पना न देता या ठिकाणी कसे आलात, तुमच्या सिनीअर पीआयचा नंबर द्या, असे सांगितले.
त्यांनी अधिकार्‍यांचा नंबर दिल्यावर त्यांना फोन करत असल्याचा बहाणा करुन तो घराबाहेर गेला व तेथून ते पळून गेले.
वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Totaya Bogus Anti-Corruption was averted by the vigilance of the Red Police; Seeing the police, the fake police hit Dhoom

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Tanaji Sawant | शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले – ‘हिंदुत्वाबद्दल जो बोलतो तो त्यांचा शत्रू’