Pune Crime | घरात थेट वीजचोरी अन् जनमित्रास मारहाण करणारा कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वीजखांबावरून घरासाठी 21 हजार रुपयांची थेट वीजचोरी (Power Theft) करणाऱ्या व ही चोरी उघड करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञासोबत (Senior Technicians) मारपीट (Beating) करणाऱ्या सुनील जाधव (Sunil Jadhav) या कंत्राटी कर्मचाऱ्यास (Contract Employee) महावितरणच्या (MSEDCL) सेवेतून मंगळवारी (दि. 12) बडतर्फ करण्यात आले आहे. यासोबतच जाधव विरुद्ध वीजचोरी (Pune Crime) केल्याप्रकरणी कलम 135 नुसार फौजदारी गुन्हा (Criminal Offense) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मंचर विभाग (MSEDCL Manchar Division) अंतर्गत नारायण उपविभागमध्ये कार्यरत कंत्राटी (आऊटसोर्स) कर्मचारी सुनील भाऊ जाधव याच्या मु. पो. नंबरवाडी वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील राहते घरी नारायणगावचे सहायक अभियंता ऋषिकेश बनसोडे (Assistant Engineer Rishikesh Bansode)
व वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास बांबळे (Senior Technician Ramdas Bamble)
यांनी वीजयंत्रणेची तपासणी केली असता त्या ठिकाणी वीजखांबावरून केबलद्वारे थेट वीजचोरी (Pune Crime) सुरु असल्याचे आढळून आले.

पंचनामा केल्यानंतर कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव याने राहत्या घरी गेल्या 24 महिन्यांपासून एकूण 1752 युनिटची म्हणजे 19 हजार 130 रुपयांची वीज चोरी केल्याचे निर्दशनास आले.
वीजचोरी व दंडासह एकूण 21 हजार 130 रुपयांचे वीजबिल घराचे मूळ मालक यांना देण्यात आले आहे.
या वीजचोरी प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station)
सुनील जाधव विरुद्ध भारतीय विद्युत कायदा (Indian Electricity Act)
2003 मधील कलम 135 नुसार फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान घरातील वीजचोरी उघडकीस आल्यानंतर कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव याने महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास बांबळे यांच्यासोबत नारायणगाव येथे मारपीट केली व गंभीर स्वरुपाचे सार्वजनिक गैरवर्तन केले.
त्यामुळे प्राईमवन वर्कफोर्स कंत्राटदार संस्थेकडून (PrimeOne Workforce Contractor Organization)
कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव विरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे जाधव याची महावितरणमधील कंत्राटी सेवा देखील तात्काळ समाप्त झाली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :-  Pune Crime | Towards a contract employee who steals electricity directly from the house and beats his friends

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा