Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ भीषण अपघात

इंदापूर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) इंदापूर येथील बाह्यवळण मार्गावर (Indapur Bypass) भरधाव वेगाने जाणारा ट्रक गतिरोधकावर आदळल्याने पाटे तुटले. यामध्ये चलकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला फळ विक्रेत्याच्या (Fruit seller) अंगावर गेल्याने भीषण अपघात (terrible accident) झाला. यामध्ये फळ विक्रेता महिलेसह दोन लहान मुले गंभीर जखमी (Two children injured) झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.26) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास भिमाई आश्रम शाळेजवळील (Bhimai Ashram School) शिंदे वस्ती चौकात (Pune Crime) झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी (Bhiwandi) येथून तुळजापूरला (Tuljapur) देव दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस इंदापूर बाह्यवळन महामार्गालत चहापानासाठी थंबली होती.
बसमधील दोन लहान मुले ही शेजारी विक्रेत्याकडून पेरू विकत घेत होती. त्याचवेळी गतीरोधकावर ट्रक आदळून त्याचे पाटे तुटले.
यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये दोन लहान मुले गंभीर जखमी झाले. (Pune Crime)

 

अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी (Indapur police) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी अपघातग्रस्तांना खासगी वाहनातून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात (Sub-district hospital) दाखल केले.
लहान मुले गंभीर जखमी असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अकलूज येथे पाठविले आहे.
पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.

 

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा

 

अपघातात गंभीर झालेल्या लहान मुलांना उपजिल्हा रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
यावेळी ड्युटीवर असणारे डॉ. नामदेव गार्डे (Dr. Namdev Garde) हे जखमी रुग्णांजवळ आले.
त्यांनी रुग्णांची तपासणी करत असताना त्यांना फोन आला. त्यानंतर ते तेथून निघून गेले आणि अर्ध्यातासाने परत येऊन मुलांवर उपचार केले.

 

Web Title : Pune Crime | truck accident indapur bypass solapur pune highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rakhi Sawant | राखी सावंतने आरती करत केलं तिचा पती रितेशचं स्वागत (व्हिडीओ)

Mumbai Indians | मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बारामतीच्या ‘या’ दोन खेळाडूंची निवड

Forest Department Maharashtra | साताऱ्यापासून सिंधुदुर्गापर्यंत व्याघ्रक्षेत्र घोषित होणार