
Pune Crime | विश्वस्ताने स्वत:च्याच कंपनीला काम देऊन केली 2 कोटींची फसवणूक ! प्रज्ञा निकेतन एज्युकेशन सोसायटीतील बाणेरमधील ऑर्किड स्कुलमधील प्रकार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शिक्षण संस्थेवर विश्वस्त म्हणून काम करताना संस्थेच्या मिळकतीचे नुतनीकरण करण्याचे काम आपल्याच खासगी कंपनीला देऊन २ कोटी १९ लाख रुपयांचा अपहार करून फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी भैरवनाथ नारायण गोडसे (वय ३७, रा. म्हाळुंगे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २८०/२२) दिली आहे.
त्यानुसार इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रव्हेंचर्स प्रा. लि. चे (Innovative Constructures Pvt. Ltd.)
बाळासाहेब काशीनाथ शिंदे Balasaheb Kashinath Shinde (रा. सकाळनगर, औंध)
आणि नंदकुमार मलकु पाटील Nandkumar Malku Patil (रा. सकाळनगर, औंध – Sakalnagar Aundh, Pune)
यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे (Pune Crime).
हा प्रकार प्रज्ञा निकेतन एज्युकेशन सोसायटी (Pragya Niketan Education Society)
या संस्थेअंगर्त दि ऑर्किड स्कुल बाणेर, पुणे (The Orchid School Baner, Pune) व नागेश करजगीर आभियांत्रिकी कॉलेज, सोलापूर (Nagesh Karjagir College of Engineering, Solapur) येथे १५ डिसेंबर २०१६ पासून आतापर्यंत घडला आहे.
—
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब शिंदे आणि नंदकुमार पाटील हे प्रज्ञा निकेतन एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून काम करीत होते.
त्यावेळी त्यांनी नागेश करजगी आभियांत्रिकी कॉलेज, सोलापूर व दि ऑर्किड स्कुल, बाणेर येथील मिळकतीचे नुतनीकरण करण्याच्या नावाखाली संस्थेची कायदेशीर प्रक्रिया केली नाही.
आपल्या पदाचा गैरवापर केला.
३ कोटी ५५ लाख ५५ हजार २३२ रुपयांची खोटी वर्क ऑर्डर त्यांच्याच इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रव्हेंचर्स प्रा. लि. कंपनीला दिली.
त्या आधारे संस्थेची २ कोटी १९ लाख रुपये इतकी रक्कम इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रव्हेंचर्स कंपनीला आर टी जी एस द्वारे देऊन त्या रक्कमेचा अपहार (Fraud Case) करुन संस्थेची आर्थिक फसवणुक व नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक माळेगावे तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update