Pune Crime | किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार; कोथरूडमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील कोथरूड परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

यश कालिदास जगताप (वय 18, रा. साईनाथ वसाहत, कोथरूड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सचिन शंकर कदम (वय 23), प्रवीण शंकर कदम (वय 29, दोघे रा. साईनाथ वसाहत, कोथरूड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि प्रवीण हे यशच्या ओळखीचे असून, एकाच ठिकाणी राहतात. रात्री अकराच्या सुमारास यश त्याच्या मित्रांसोबत साईनाथ वसाहतीमध्ये गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी यशला शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | two accused who attacked youth with weapon arrested in kothrud

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Manmohan Hospitalized | हार्ट अटॅक आल्याने सिने निर्माते नितीन मनमोहन रुग्णालयात; प्रकृती चिंताजनक

Mumbai Gangrape | धक्कादायक ! घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टवर दिले सिगारेटचे चटके

Uddhav Thackeray | ‘महाविकास’ सरकार पाडण्यासाठी आर्थिक रसद पुरविणार्‍याबाबत शिवसेनेने केला मोठा दावा,

Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे