Pune Crime | अग्नीपथ साठी बनावट डोमिसाईल काढून देणार्‍या दोघा एजंटांना अटक; मुंबई परिसरात रहात असल्याचे काढून दिले डोमिसाईल

पुणे : Pune Crime | केंद्र सरकारच्या (Central Government) संरक्षण विभागाच्या आर्मीतील (Army) अग्नीपथ योजनेत (Agneepath Scheme) सैन्य भरतीसाठी (Military Recruitment) मुंबई परिसरात रहात असल्याचे बनावट डोमिसाईल प्रमाणपत्र (Fake Domicile Certificate) काढून देणाऱ्या दोघा एजंटांना गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

पोपट विठ्ठल आलंदार Popat Vitthal Alandar (वय ३८) आणि सुरेश पितांबर खरात Suresh Pitambar Kharat (वय ३१, दोघेही रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट रबरी शिक्के (Fake Rubber Stamps), कोरे शाळा सोडल्याचे दाखले, डोमिसाईल प्रमाणपत्र, रोख रक्कम, इतर दस्त, मोबाईल, कार असा ४ लाख ५५ हजार ७०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल होळकर (Police Constable Rahul Holkar) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३१/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या सरंक्षण दलामध्ये अग्नीपथ ही सैन्य भरतीची नवी योजना आणली आहे. त्यासाठी मुंबई येथे भरती होणार आहे.
त्याची नुकतीच जाहिरात आली होती.
या जाहिरातीवरुन काही अ‍ॅकेडमीने उमेदवारांशी संपर्क साधला.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील उमेदवारच भरती होऊ शकतात.
अन्य ठिकाणी राहणारे येथे भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे दाखविण्यासाठी
या एजंटांनी बनावट शाळा सोडल्याचे दाखले, भाडेकरार, सरपंचांचा दाखला अशी कागदपत्रे तयार केली.
त्या आधारे सेतू केंद्रातून डोमिसाईल प्रमाणपत्र तयार करुन घेतले आहे.
अशी कागदपत्रे असलेले दोघे जण मुंबई पुणे बंगलोर महामार्गावरील वडगाव येथील दांगट पाटील एम्पायर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे मिळालेले बनावट रबरी शिक्के, कोरे शाळा सोडल्याचे दाखले यांची पोलिसांनी चौकशी केली.
त्यातून हा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे त्यांनी ३० ते ४० परिक्षार्थीचे डोमिसाईल या एजंटांनी तयार करुन घेतल्याचे आता पर्यंतच्या तपासात समोर आले आहे.
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर
(Assistant Commissioner of Police Narayan Shirgaonkar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Two agents arrested for removing fake domicile for Agneepath; Domicile removed as living in Mumbai area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Cricket News | वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या ‘या’ कॅप्टनला झाली मोठी दुखापत

Pune Crime | ‘हम यहा के भाई है’ ! धनकवडी-चव्हाणनगर परिसरात दहशत पसरविण्यासाठी तरुणावर तिघा गुंडाकडून कोयत्याने वार घावामुळे तुटले बोट