Pune Crime | प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांकडून अटक, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांची गाडी अडवून त्यांच्याकडील पैसे, मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या (Vehicle Thief) दोन सराईत गुन्हेगारांना (Pune Criminals) खडकी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून दोन रिक्षा, दुचाकी असा एकूण 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कंपाउंडमध्ये करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी गुन्हे (Pune Crime) उघडकीस येण्याची शक्यता खडकी पोलिसांनी (Khadki Police) व्यक्त केली आहे.

 

अमोल संजय भोसले Amol Sanjay Bhosale (वय-21 रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), विक्रांत उर्फ पापड मनोज आल्हाट Vikrant alias Papad Manoj Alhat (वय-25 रा. मुळा हाऊस खडकी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत तुषार अरुण शिंदे Tushar Arun Shinde (वय-18 रा.नागरस रोड, औंध) याने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास जुना पुणे-मुंबई रोडने (Old Pune-Mumbai Road) अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून जात होते. पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी फिर्यादी यांच्या दुचाकीला आडवी घालून कोयत्याचा धाक दाखवून दुचाकी चोरून नेली. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी स्वागत हॉटेल समोरील मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कंपाउंडमध्ये बसले असल्याची माहिती पोलीस शिपाई भगवान हंबर्डे (Bhagwan Humberde) आणि अनिरुद्ध सोनवणे (Aniruddha Sonawane) यांना समजली.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Commissionerate) सांगवी (Sangvi Police Station) आणि भोसरी पोलीस ठाण्यातील (Bhosari Police Station) दोन गुन्ह्यांसह खडकी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून दोन रिक्षा, 6 दुचाकी असा एकूण 4 लाख 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे (ACP Rajendra Galande),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior Police Inspector Dattatraya Chavan),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता जाधव (Police Inspector Police Sangita Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी (PSI Mohan Salvi), तानाजी कांबळे, पोलीस नाईक उद्धव कलंदर,
संदेश निकाळजे, राजकिरण पवार, पोलीस शिपाई अनिरुद्ध सोनवणे, भगवान हंबर्डे, जहांगिर पठाण,
स्वप्निल घोलप, विलास शेवाळे, सनी नांद्रे, साईनाथ म्हस्के यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Two arrested for robbing passengers, Rs 4 lakh seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ind Vs SL New Schedule | लखनऊमध्ये होणार भारत-श्रीलंकेचा पहिला टी-20 सामना, BCCI ने जारी केले नवीन वेळापत्रक

 

Pune Crime | मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बंडगार्डन पोलिसांकडून पर्दाफाश, 15 लाखांचे 70 मोबाईल जप्त (व्हिडिओ)

 

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुकीवर दुप्पट होतील पैसे, बुडण्याची सुद्धा भीती नाही; जाणून घ्या सविस्तर