क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Crime | मांजरीत खून करुन पसार झालेल्या दोघांना आष्टीमध्ये अटक; वेशांतर करुन पोलिसांना देत होते गुंगारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मांजरी (Manjri) येथील पेंटरला लाकडी दांडा व प्लास्टिक पाईपने डोक्यात मारहाण करुन सागर दासमे याचा खून (Murder In Pune) करुन पळून गेलेल्या दोघांना आष्टी पोलिसांनी (Ashti Police Beed) जेरबंद केले. दोघांनीही वेशांतर करुन दाढी लावून ते फिरत असल्याचे आढळून आले. (Pune Crime)

 

गौरव कारकिले आणि राजू सोनवणे (रा. महादेवनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, सागर गिरीधर दासमे (वय २७, रा. महादेवनगर, मांजरी) असे खून झालेल्या पेंटरचे (Murder Of Painter In Manjri Pune) नाव आहे. ही घटना मांजरीमधील महादेवनगर येथील गणेश निवास येथे ५ जून रोजी दुपारी २ ते ६ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली होती. (Pune Crime)

 

सागर दासमे हा पेटिंगचे काम करत होता. गौरव व राजू हेही पेटिंगचे काम करतात सागरच्या घरी या दोघांचे येणे जाणे होते. सागर रविवारी दुपारी गौरव राहत असलेल्या गणेश निवास येथे गेला होता. सोमवारी दुपारच्या वेळी त्याच्या घराचा दरवाजा नुसताच लोटलेला घरमालकिणींना दिसून आला होता. त्यांनी आत जाऊन पाहिले तर सागर येथे पडलेला आढळून आला. गौरव व राजू हे फरार झाले होते. गेल्या १५ दिवस हडपसर पोलीस त्यांचा शोध घेत होते.

आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते. पुणे पोलिसांनी आरोपींचे वर्णन व माहिती आष्टी पोलिसांना दिली. त्यानुसार नगरवरुन बीडकडे (Beed News) जात असताना रविवारी दुपारी दोघेही आरोपी कडा येथील जुन्या बसस्थानक परिसरात आल्याची माहिती मिळाली.

 

आष्टीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस (Police Inspector Salim Chaus) यांना याबाबत माहिती मिळाली होती.
त्यांची छायाचित्रेही पोलिसांनी पाठविली होती.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कडा परिसरात तपासणी सुरु केली. तेव्हा एका बारसमोर दोघे जण संशयास्पदरित्या वावरत असल्याचे पोलिसांना दिसले.
परंतु, पुणे पोलिसांनी पाठविलेले फोटो आणि प्रत्यक्ष दिसणारे हे दोघे यामध्ये फरक वाटत होता.
त्यामुळे काही वेळ पोलिसांनी दबा धरुन खात्री केली. त्यानंतर त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी खूनाची कबुली दिली.
आष्टी पोलिसांनी दोघांना पुणे पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात दिले. दोघांनाही सोमवारी पहाटे पुण्यात आणले आहे.
हडपसर पोलीस (Hadapsar Police) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | Two arrested in Ashti for Painter Murder Case Manjri Pune Police Crime News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button