Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पत्रकार (journalist) असल्याचे ओळख पत्र गळ्यात घालून आम्ही क्राईम प्रेस रिपोर्टर (Crime Press Reporter) असल्याचे सांगून परमिट रुमचालकाकडे हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना पुण्यातील (Pune) खडक पोलिसांनी (Khadak Police) सापळा रचून अटक केली. हाजलिना प्रमोद जयस्वाल Hajalina Pramod Jaiswal (वय 35, रा. ताडीवाला रोड) आणि सतपाल सिंग अमरसिंग बग्गा Satpal Singh Amarsingh Bagga (वय 57, रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांवर खंडणीचा (extortion) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका 30 वर्षाच्या परमिट रुम चालकाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचे सेवन लव चौक (seven loves chowk) येथे इंप्रेस सेव्हन लव्हज नावाचे परमिट रुम (impress seven loves permit room) आहे. त्यांच्याकडे हाजलिना जयस्वाल व सतपाल बग्गा हे शनिवारी आले होते. त्यांनी गळ्यात प्रेस सीसीटी क्राईम चेक टाईम्स नावाचे ओळखपत्र घातले होते. त्यांनी आम्ही क्राईम प्रेस रिपोर्टर (Crime Press Reporter) असून तुम्ही अवैद्यरित्या दारुची विक्री करीत आहात. लोकांना आपल्या परमिटरुममध्ये बसवून दारु पिण्याची परवानगी देत आहात. तुमच्यावर कारवाई करणार आहे. तुमच्या मालकांना आमची टीम बोलवत आहे, असे सांगितले. त्यानंतर ते एक हजार रुपये घेऊन तेथून निघून गेले. काही वेळाने त्यांनी फोन करुन जर केस करायची नसेल तर जादा 5 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. फिर्यादी यांनी खडक पोलिसांना (Khadak Police) फोन करुन याची माहिती सांगितली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली. शनिवारी दुपारी दीड वाजता ते पैसे घेण्यासाठी आले असताना पोलिसांनी दोघांना पकडले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दोघांकडील ओळखपत्र बनावट असल्याचे दिसत आहे.
ते आपण प्रेस सीसीटी क्राईम चेक टाईम्सचे पत्रकार असून ते दिल्लीत रजिस्टर असल्याचे सांगतात.
मात्र, अशी कोणते प्रेस असल्याचे इंटरनेटवर दिसत नाही.
गुन्हयाचा पुढील तपास खडक पोलिस (Khadak Police) करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | Two arrested, including a female journalist

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Rains | मुंबईला जाताय तर अगोदर जाणून घ्या तेथील परिस्थिती; अतिवृष्टीमुळे पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प

Pune Crime | 67 बँक अकाऊंट वापरत पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा; दिल्लीतून दोघांना अटक, 21 मोबाईल, हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 Sim Card जप्त