Pune Crime | पुण्यात शेततळ्यात बडून दोघा मुलांचा मृत्यु; धायरीतील खंडोबा देवस्थान माळ येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खंडोबा देवस्थानाचे दर्शन घेऊन परत जाताना पाण्यात पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या १३ व १४ वर्षाच्या दोन मुलांचा बुडून मृत्यु झाला. रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता धायरीतील (Dhayari) खंडोबा देवस्थान माळ (Khandoba Devasthan Mal) येथील शेत तळ्यात (Farm Pond) ही घटना घडली. (Pune Crime)

 

सुरज शरद सातपुते (वय १४, रा. अभिनव कॉलेजजवळ, नर्‍हे) आणि पुष्कर गणेश दातखिल (वय १३, रा. धनगर वस्ती, नर्‍हे) अशी या मुलांची नावे आहेत. याबाबत अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले की, ही दोन मुले व त्यांचा एका मित्र अथर्व चव्हाण हे तिघे आज सकाळी खंडोबा देवस्थान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना ते शेजारील शेतावरील कंपाऊंडावरुन उडी मारुन आत शिरले. कपडे काढून तेथील शेततळात त्यांनी पोहण्यासाठी उड्या मारल्या. अथर्व चव्हाण हा कडेलाच थांबला होता. (Pune Crime)

 

या शेततळ्यात साधारण ८ ते ९ फुट पाणी आहे. शेततळ्याला कडेने मध्यभागापर्यंत उतार असतो. तसेच खाली चिकट माती जमलेली असते. त्यामुळे या मुलांना पोहताना कडेला येता आले नाही. ते पाण्यात बुडाले. दोघेही वर येत नसल्याचे पाहून अथर्व याने आरडाओरडा करुन लोकांना बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी (Pune Fire Brigade) येऊन या दोघा मुलांना बाहेर काढले. तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता.

 

Web Title :- Pune Crime | Two children dead in farm pond of Pune; Incident at Khandoba Devasthan mala in Dhayari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Child Saving Plan | आई-वडिलांनी ‘या’ योजनेत रोज जमा करावे अवघे 67 रुपये, 5 वर्षात तुमचे मुल होईल लखपती

 

Shivajirao Adhalrao Patil | शिवसेना अजूनही गोंधळलेली रात्री हकालपट्टी, सकाळी इन्कार ! शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच

 

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा शेअर, वर्षभरात रू. 90 लाख नफा, 7300% रिटर्न