Pune Crime | वकील महिलेकडे खंडणी मागणार्‍या दोघा सराईतांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका वकील महिलेकडे खंडणी मागणार्‍या सराईतांना पोलिसांनी अटक केले आहे. दुकानासमोर (Pune Crime) असलेल्या मोकळ्या जागेत दुचाकी लावल्यास पैसे द्याावे लागतात म्हणत वकील महिलेकडे खंडणी मागितली आहे. यानंतर महिलेनं लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली. यावरुन सनी उर्फ दशरथ शाम म्हेत्रे (वय, 33, रा. भवानी पेठ) व सागर राजू बग्गन (वय 33, रा. नक्षत्र बंगला, मोझे वस्ती, लोहगाव) या दोघांना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) केली आहे.

याबाबत माहिती अशी की, भवानी पेठेत फिर्यादी वकील महिलेचे झेरॉक्सचे दुकान तसेच कार्यालय आहे. दुकानासमोर असलेल्या मोकळ्या जागेत वाहने लावण्यात आल्यानंतर सनी म्हेत्रे (Sunny Mhetre) आणि साथीदार सागर बग्गन (Sagar Baggan) यांनी वाहनचालकांकडून पैसे घेण्यास सुरूवात केली. वकील महिलेने तिची दुचाकी काही दिवसांपूर्वी लावली. त्यावेळी या दोघां आरोपींनी त्यांच्याकडे पैसे मागितले. वकील महिलेने दोघांकडे विचारणा केली असता, तेव्हा या भागातील सर्व दुकानांसमोर दुचाकी लावल्यास पैसे द्याावे लागतात, असे त्यांनी सांगितले. यावरुन महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल (FIR) झाल्याचे कळताच दोघे आरोपी पसार झाले.

दरम्यान, दोघेजण भवानी पेठेतील पूना कॉलेजसमोर असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या (युनिट-1) मधील पोलिसांना मिळाली.
या माहितीवरुन गुन्हे शाखेच्या पथकांनी ट्रॅप लावला. आणि दोघा आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, आरोपींविरोधात यापूर्वी अमली पदार्थ बाळगणे, जबरी चोरी, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय शैलेश संखे (PI Shailesh Sankhe), उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), अमोल पवार (Police Amol Pawar) , अजय थोरात (Police Ajay Thorat), महेश बामगुडे (Police Mahesh Bamgude), तुषार माळवदकर (Police Tushar Malvadkar) यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Two criminals arrested for demanding ransom from lawyer woman; pune police crime Branch action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BSNL ‘या’ ग्राहकांना देतंय 4 महिन्यापर्यंत फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस, जाणून घ्या सविस्तर

PM Kisan | लवकर दुरूस्त करा आपले नाव आणि आधारसंबंधी चुका, ‘या’ दिवशी येईल PM Kisan चा 10वा हप्ता

Jacqueline Fernandez | ‘ईडीला उत्तर’न देता जॅकलीन पोहोचली ‘रामसेतू’च्या शुटिंगसाठी