Pune Crime | मार्केटयार्डमधील टेम्पोचालकाला लुटणार्‍या दोघा गुन्हेगारांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | मार्केटयार्डमधून (Market Yard) माल घेऊन जाणार्‍या एका टेम्पोचालकाला (Temp Driver) अडवून त्याला लुटणार्‍या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime)

बबलु ऊर्फ कपिल अतुल शिंदे (वय १९) आकाश सुरवसे (वय २५) आणि आवी निंबाळकर (वय २२, सर्व रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. शिंदे आणि सुरवसे यांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

याबाबत आशिष तुकाराम राठोड (वय २६, रा. कारोळ पो. गहुली, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७३/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे भंगार माल घेऊन गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता टेम्पो घेऊन जात होते. यावेळी वखार महामंडळाजवळ आरोपीनी मोटारसायकलवरुन येऊन त्यांची गाडी अडविली. राठोड व त्यांच्या सोबतचे मित्र कुंदन पवार यांना धमकावून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल असा १७ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून घेतले. राठोड यांनी विरोध केल्याने त्यांच्यात झटापट झाली. तेव्हा जमलेल्या लोकांनी त्यांच्यातील एकाला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. आकाश सुरवसे याला पोलिसांनी पकडले. निंबाळकर पळून गेला. बबलु शिंदे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Two criminals arrested for robbing a tempo driver in a market yard pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर