Pune Crime | बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचा विश्रांतवाडीच्या खाणीत आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  पुण्यातील विश्रांतवाडी (Vishrantwadi) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विश्रांतवाडी येथील खाणीत (Mine) दोन तरुणांचे (Young Men) मृतदेह (Dead Body) आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विकी लंके Vicky Lanke (वय – 20) आणि 20 वर्षीय युवक (नाव अद्याप समजलेले नाही) अशी मृतांची नावे आहे. या दोघांचा खून (Murder) झाल्याचा आरोप विकी आणि 20 वर्षीय युवकच्या नातेवाईकांनी (Pune Crime) केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी रात्री विकी आणि 20 वर्षीय युवक हे दोघे बेपत्ता (Missing) झाले होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. अखेर दोघांच्या नातेवाईकांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.

 

आज (शनिवार) विकी आणि 20 वर्षीय युवक या दोघांचे मृतदेह विश्रांतवाडीच्या खाणीत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच दोघांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
विकी आणि प्रसन्न या दोघांची हत्या झाली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | two dead bodies found in vishrantwadi mine of pune pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा