Pune Crime | खडकवासला धरणाच्या ‘बॅक वॉटर’ मध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

  • पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रविवारी सकाळी खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) बॅक वॉटरमध्ये (Back Water) दोन 23 वर्षीय तरूणांचे मृतदेह आढळून आले (Two Dead Body Found In Khadakwasla Dam Back Water). धरण परिसरातील नागरिक येथील मोर्‍यांमध्ये कपडे धुण्यासाठी गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. कपडे धुण्यासाठी हे नागरिक गेले असता पाण्यावर तरंगत असलेले मृतदेह दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी धरणाच्या सुरक्षारक्षकांना माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी घटनास्थळावर धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरूणांची नावे विजय नागनाथ रोकडे (वय 23) आणि रॉबिन कुबेर वाघमारे (वय 23) अशी आहेत. हे दोन्ही तरूण दिवसांपासून बेपत्ता होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Pune Crime)

 

मृत दोन्ही तरूण वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरात राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते दोघे एकत्र घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परलेच नाहीत. या दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मयत तरूणांच्या सोबत असलेल्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दोन्ही तरूणांच्या मृत्यूमागे इतर काही कारण आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Two dead body found in khadakwasla dam back water

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kashmera Shah – Urfi Javed Controversy | पुन्हा कश्मिरा शाहनं उडवली उर्फी जावेदची खिल्ली; म्हणाली – ‘तिकिट खरेदी करून एअरपोर्टवर जात जा..’

 

Janhvi Kapoor Body Surgery | फॅशनच्या नादात जान्हवी कपूर झाली ट्रोल नेटकरी; म्हणाले – ‘गरिबांची काइली जेनर’

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात दहावीत शिकणार्‍या मुलीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, घात की अपघात?